तळोदा (जि. नंदुरबार) : ऊसतोडणी करून उसाची वाहतूक करताना अपघातांची संख्या वाढत असल्याने शेतकऱ्यांना (Farmer) नाहक आर्थिक भुर्दंड बसत असल्याची परिस्थिती आहे. (Due to increasing accidents while transporting sugarcane after cutting cane farmers are facing financial hardship nandurbar news)
त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतातून उसाने भरलेले वाहन शेताबाहेर मुख्य रस्त्यावर लागल्यानंतर अपघात व उसाचे होणारे नुकसान यांची जबाबदारी संबंधित खांडसरी अथवा कारखान्यांनी घ्यावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
त्यात ऊसाची तोडणी करवून घेण्यासोबत आता रस्त्यावरच उसाचे होणारे नुकसान शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. तळोदा तालुक्यात दर वर्षी सुमारे दहा हजार हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीखाली असते. तालुक्याचे अर्थकारण नेहमी ऊस या पिकाभोवती फिरत आले आहे.
त्यात शेतकऱ्यांना उसाची तोडणी सुरू करण्यापासून ते ऊस खांडसरी व कारखान्यापर्यंत पोचेंपर्यंत नेहमी अलर्ट राहावे लागते. त्यात ऊसतोडणी मुकादम ते मजूर या सर्वांची मनधरणी करावी लागते. ती मनधरणी बडदास्तपर्यंतदेखील पोचत असते.
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
त्यात रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचा अपघात ही मोठी समस्या बनली आहे. दररोज कुठे ना कुठे ट्रॉली पलटी होण्याचा घटना घडत असतात. गुरुवारी (ता. ९) तळोदा-आमलाड रस्त्यावर अमरधामजवळ ट्रॅक्टर ट्रॉली उलटून वाहतूक कोंडी झाली होती.
रस्त्यावर दोन्ही बाजूला ते थेट आमलाड गावापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. फॉरेस्ट नाक्याजवळ ट्रॉलीचा ॲक्सेल तुटल्याने ड्रायव्हर बालंबाल बचावला होता. अशा घटनांत पलटी झालेल्या ट्रॉलीतून उसाचे नुकसान होत असते. त्यात पुन्हा ट्रॉली भरावी लागते.
ऊस वाहतूक करताना अशा वेळी शेतात व शेताबाहेर रस्त्यावर ट्रॉली पूर्ववत करण्यासाठी जेसीबीसारखे वाहन मागवून ट्रॉली पूर्ववत करावी लागते. जेसीबी मालक व चालक यासाठी एकावेळी दोन हजार ते तीन हजार रुपये आकारत असतात.
त्यात ऊसतोडणी सुरू करण्यापासून ते ऊस वाहतूक करून पोचेपर्यंत शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत असतो. त्यामुळे वाहतुकीचे नियोजन वाहन मालक व चालक यांना करून द्यावे. ओव्हरलोड वाहन असल्यास तंबी देणे आदी नियोजन खांडसरी व कारखान्यांनी करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
"ट्रॉली पलटी झाल्यास जेसीबी मागवावे लागते. त्याचे दोन हजार ते पाच हजार रुपये द्यावे लागतात. ओव्हरलोड ट्रॉली शेतातून काढण्यासाठीदेखील जेसीबी मागवावे लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत असतो. त्यामुळे ऊस वाहतुकीचे नियोजन होणे गरजेचे आहे."
-एक त्रस्त शेतकरी, तळोदा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.