धुळे : शहरातील गरूड मैदानात खाशाबा जाधव राज्यस्तरीय (State Level) करंडक कुस्ती स्पर्धा सुरू झाली आहे.
ती शनिवारपर्यंत चालेल. (due to Khashaba Jadhav State Level Trophy Wrestling Tournament Changes in transport routes dhule news)
या स्पर्धेदरम्यान कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात काही ठिकाणी वाहतुकीत पोलिस प्रशासनाने बदल केला आहे. गरुड मैदान ते जिल्हा कारागृह या मार्गावर होणाऱ्या पार्कींगसाठी २२ ते २५ फेब्रुवारीपर्यंत दुपारी चार ते रात्री दहा या वेळेत सर्व प्रकारची
वाहतुक तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचा आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी मंगळवारी काढला. या काळात नागरीकांनी संतोषीमाता चौक किंवा नवीन महापालिका इमारत येथून पर्यायी मार्गाचा अवलंब करत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. बारकुंड यांनी केले.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
मोठ्या पुलावरील वाहतुकीत बदल
विशेष अधिकाराचा वापर करुन जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी शहरातील मोठ्या पुलावरील वाहतुकीत अंशतः बदल केला आहे. पांझरा नदीवरील मोठ्या पुलाचा एक भाग जुना दगडी पुल हा हलक्या व कमी उंचीच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करीत आहे, असा आदेश श्री. बारकुंड यांनी मंगळवारी निर्गमित केला आहे. इतर वाहनांनी पर्यायी मार्गाचाच वापर करावा, असेही आदेशात नमूद आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.