Nandurbar News : शिक्षकांचा मे महिन्यापासून वेतनविना उदरनिर्वाह!

due to no new pay superintendent payment of teachers not given nandurbar news
due to no new pay superintendent payment of teachers not given nandurbar newsesakal
Updated on

Nandurbar News : राज्यातील २२०२ एच ९७३, १९०१ व १९४८ या लेखाशीर्षावर कार्यरत माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मे महिन्यापासून वेतन झालेले नाही.

मंजूर झालेला निधी वितरित होऊन आठवडा झाला आहे. ऐनवेळी माध्यमिक वेतन अधीक्षकांची बदली झाली. नवीन वेतन अधीक्षक नसल्याने वेतन रखडले आहे. (due to no new pay superintendent payment of teachers not given nandurbar news)

आदिवासी विकास विभाग व शालेय शिक्षण विभाग यांनी ३० जूनला मंजूर निधीपैकी १४ टक्के निधी म्हणजे १४ कोटी ५९ लाख ३१ हजार ३० रुपये वितरित करणारे पत्र पारित केले. राज्यातील विभागनिहाय शिक्षण संचालकांनी निधी वितरित केला. नंदुरबार जिह्यातील कर्मचाऱ्यांचे मे महिन्यापासून वेतन नाही. वेतनाअभावी सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.

मार्च, एप्रिल महिन्यात इन्कम टॅक्स भरल्याने मोठ्या आर्थिक अडचणीत कर्मचारी सापडला आहे. शासनाने नेहमीप्रमाणे उशिरा निधी वितरित केला, वेतन मिळेल या आशेने कर्मचारी आनंदात होते मात्र ज्यावे ळी सत्य परिस्थिती समोर आली तेव्हा पायाखालची जमीन सरकली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

due to no new pay superintendent payment of teachers not given nandurbar news
Nandurbar News : सुप्तगुणांना वाव मिळण्यासाठी ‘त्यांच्या’ भावविश्वात भरले रंग! ‘इन्कलाब’चा स्तुत्य उपक्रम

नंदुरबार वेतनपथक कार्यालयातील माध्यमिक वेतन अधीक्षक प्रमोद पाटील यांची उपशिक्षणाधिकारीपदी बदली झाली. नवीन वेतन अधीक्षक आलेले नाहीत.

त्यांच्या जागी कोणालाही सहीचा अधिकार शिक्षण उपसंचालकांनी अद्याप दिला नसल्याने निधी उपलब्ध असून, नंदुरबार जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचित राहावे लागत आहे, दुष्काळात तेरावा महिना अशी गत झाली आहे

due to no new pay superintendent payment of teachers not given nandurbar news
Nandurbar News : तापी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा; बॅरेजेसचे प्रत्येकी 2 गेट अर्धा मीटरने उघडले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.