Ekvira Devi Yatrotsav : भक्तिभावात रथ शोभायात्रा; सडा रांगोळ्यांनी स्वागत, दर्शनास गर्दी

Rath Shobhayatra started on Thursday on the occasion of Sri Ekvira Devi Yatrotsavam.
Rath Shobhayatra started on Thursday on the occasion of Sri Ekvira Devi Yatrotsavam. esakal
Updated on

धुळे : चैत्र पौर्णिमेनिमित्त येथील पांझरा नदीकिनारी श्री एकवीरादेवी यात्रोत्सव (Ekvira Devi Yatrotsav) सुरू झाला आहे. यात मंदिर व्यवस्थापनातर्फे शहरात गुरुवारी (ता. ६) सायंकाळी रथ शोभायात्रा काढण्यात आली. (Ekvira Devi jatrotsav On occasion of Chaitra Purnima started dhule news)

आदिशक्ती श्री एकवीरामातेस महाअभिषेक व पाद्यपूजन मंदिराचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव व त्यांच्या पत्नीच्या हस्ते झाले. दरम्यान, शहरात सायंकाळनंतर अधूनमधून झालेल्या पावसाने यात्रोत्सवातील आनंदावर विरजण घातले.

खानदेशची कुलस्वामिनी श्री एकवीरादेवीची पालखी, रथपूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तुळशीराम गावित, युवा सेनेचे अ‍ॅड. पंकज गोरे, नगरसेवक हिरामण गवळी, माजी महापौर जयश्री अहिरराव, कमलाकर अहिरराव, स्थायी समिती सभापतीचे माजी सभापती कैलास चौधरी, गुलाब माळी, रूपक बडगुजर, जयेश मगर, पप्पू ढापसे, अजिंक्य धात्रक, दत्ता शिंदे, किशोर चौधरी आदी उपस्थित होते.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Rath Shobhayatra started on Thursday on the occasion of Sri Ekvira Devi Yatrotsavam.
World Health Day 2023 : हृदयविकाराने रोज किमान एक मृत्यू; आपणही हृदयरोगी आहोत का?

श्री एकवीरादेवी मंदिरापासून शोभायात्रेला सुरवात झाल्यावर नेहरू चौक, पंचवटी, मोठा पूल, गांधी पुतळा, नगरपट्टी, गल्ली क्रमांक सहा, चर्नी रोड, खोलगल्ली, पारोळा रोडवरील रेलन क्लॉथसमोरून पुन्हा कराचीवाला खुंट, राममंदिर व सरळ आग्रा रोडमार्गे मोठ्या पुलावरून रथ शोभायात्रा मंदिरापर्यंत पोचली. सहभागी भाविकांनी रथ ओढला. रथमार्गावर ठिकठिकाणी सडा, रांगोळ्या काढून, कमानी उभारून महिलांनी औक्षण केले.

दर्शनासाठी भाविकांची गर्दीही होती. राज्यातील पाचवे शक्तिपीठ म्हणून श्री एकवीरादेवी मंदिराची ख्याती आहे. २० एप्रिलपर्यंत देवीचा यात्रोत्सव होणार आहे. या काळात रोज पहाटे पाच, सकाळी आठ, दुपारी बारा, सायंकाळी सात व रात्री आडेअकराला आरती होईल. पहाटे पाच ते रात्री बारापर्यंत मंदिर भाविकांसाठी खुले असेल. यात्रोत्सवामुळे मंदिर परिसरात मनोरंजनाच्या खेळण्यांसह निरनिराळे व्यावसायिक रोजगाराची पर्वणी साधत आहेत.

Rath Shobhayatra started on Thursday on the occasion of Sri Ekvira Devi Yatrotsavam.
Hanuman Jayanti 2023 : धुळ्यात ‘जय हनुमान’चा जयघोष!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.