Nandurbar Leopard Attack : प्रातर्विधीसाठी गेलेली महिला बिबट्याच्या हल्ल्यात जखमी

Nandurbar Leopard Attack : प्रातर्विधीसाठी गेलेली महिला बिबट्याच्या हल्ल्यात जखमी
Updated on

Nandurbar Leopard Attack : तालुक्यातील दुर्गम आदिवासी भाग असलेल्या चिडमाळ येथे बिबट्याने अचानक हल्ला केल्याने त्यात ज्येष्ठ महिला जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १५) घडली. महिला जखमी झाल्यानंतर चिडमाळ येथून येण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांनी महिलेला लाकडाची झोळी करून चौगावपर्यंत आणले.

तेथून सोमावल प्राथमिक आरोग्य केंद्राची ॲम्ब्युलन्सने उपजिल्हा रुग्णालयात महिलेला दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून, बिबट्याचे हल्ले आता नित्याचे होऊ पाहत आहेत. त्यामुळे तालुक्यात चिंता वाढली आहे.

चिडमाळ (ता. तळोदा) सातपुड्यातील दुर्गम गाव आहे. (Elderly woman injured in leopard attack nandurbar news)

शेलूबाई सेगा वळवी (वय ६०) ही महिला पती व दोन मुलांसह तेथे राहते. शुक्रवारी पहाटे साडेपाचला महिला प्रातर्विधीसाठी उठली असता तिच्या घराजवळच असलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर हल्ला करून तिला पकडले. अचानक झालेल्या हल्ल्याने वृद्ध महिला घाबरली व तिने आरडाओरडा सुरू केला.

आरडाओरड ऐकून घरात झोपलेली दोन्ही मुले व पती तसेच शेजारी राहणारे धावून आले. लोकांनी लागलीच मोठा आरडाओरडा करून महिलेला बिबट्याच्या तावडीतून सोडविले. जमाव पाहून व मोठा आवाज केल्याने बिबट्या शेतातून जंगलात पळाला. त्यानंतर मुले व तिच्या नातेवाइकांनी लाकडी दांड्याची झोळी करून या जखमी महिलेला चौगावपर्यंत पायी आणले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nandurbar Leopard Attack : प्रातर्विधीसाठी गेलेली महिला बिबट्याच्या हल्ल्यात जखमी
Nandurbar Leopard Attack : रांझणीत बिबट्याच्या हल्ल्यात एकजण जखमी; बालकाच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ भयभीत

सोमावल प्राथमिक आरोग्य केंद्रात फोन करून कळविण्यात आले. त्यानंतर आरोग्य केंद्राची ॲम्ब्युलन्स चौगाव येथे आली. तेथून जखमी महिलेला तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. महिलेवर सध्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दुसरीकडे तालुक्यात बिबट्याचा वावर असून, मानव वस्तीवर हल्ले सुरू आहेत, तर काहींना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. त्यामुळे बिबट्याचे हल्ले नित्याचे होऊ पाहत असून, वन विभागाने याची गंभीरपणे दखल घेऊन तातडीने याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

Nandurbar Leopard Attack : प्रातर्विधीसाठी गेलेली महिला बिबट्याच्या हल्ल्यात जखमी
Nandurbar Leopard Attack : जेव्हा गोशाळेसमोर बिबट्या ठाण मांडतो! जीव मुठीत धरून अनुभवला बिबट्याचा थरार...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.