Market Committee Election : तळोदा बाजार समितीसाठी 'या' तारखेला मतदान

Election of Agricultural Produce Market Committee
Election of Agricultural Produce Market Committee esakal
Updated on

तळोदा (जि. नंदुरबार) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक (Market Committee Election) कार्यक्रम नुकताच नव्याने जाहीर करण्यात आला असून, २८ एप्रिलला मतदान होणार आहे.

मतदानानंतर पुढील तीन दिवसांत मतमोजणी व निकाल घोषित होणार आहे. तसे आदेश जिल्हा निवडणूक प्राधिकरणाने दिले. (Election of Agricultural Produce Market Committee voting will be held on April 28 nandurbar news)

कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ग्रामपंचायत सदस्य, शेती सेवा संस्था, अडते, व्यापारी व माथाडी कामगार यांचे मतदान ग्राह्य मानले जाते. त्यानुसार येथील बाजार समितीची निवडणूक चार महिन्यांपूर्वीच जाहीर झाली होती. तेव्हाच्या मतदारयादीत ग्रामपंचायतीच्या जुन्या सदस्यांनी नावे मतदार म्हणून समाविष्ट होती.

हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यामुळे नव्याने सदस्य झालेल्यांची नावे यादीत असावीत, यासाठी न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. त्यानंतर जाहीर निवडणूक रद्द करून नव्याने ग्रामपंचायत सदस्यांची नावे संकलित करून सुधारित यादी निवडणूक प्राधिकरणास द्यावी, असे आदेश निवडणूक प्राधिकरणाने दिले होते. त्यानुसार गेल्या महिन्यात सुधारित मतदारांची यादी बाजार समितीने पाठविली होती. त्यानंतर प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

दरम्यान, राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी नुकतीच पार पडली होती.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Election of Agricultural Produce Market Committee
Dhule News : सोनगीरच्या बोकड बाजारात गर्दी; बाजारात पोचण्यापूर्वीच रस्त्यावरच खरेदी-विक्री

यासाठी निवडणुकीकरिता जाहीर कार्यक्रमानुसार नव्याने निवडून येणारे ग्रामपंचायत सदस्य बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदान करण्यापासून वंचित राहू नयेत, याशिवाय ग्रामपंचायतीचे नवीन निवडून येणाऱ्या सदस्यांची नावे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदारयादीत समाविष्ट करून मतदारयादी अंतिम होईपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका स्थगितीसाठी राज्य सहकार प्राधिकरणाने केलेली विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मान्य केली होती.

त्यामुळे बाजार समित्यांच्या निवडणुका १५ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे राज्यभरातील बाजार समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या.

निवडणूक कार्यक्रम

-५ एप्रिल ः अर्ज छाननी

-६ एप्रिल ः वैध अर्ज प्रसिद्धी

-२० एप्रिल ः अर्ज माघाराची अंतिम मुदत

-२१ एप्रिल ः चिन्हवाटप

-२८ एप्रिल ः मतदान

मतदानाच्या दिवसापासून पुढील तीन दिवसांच्या आत मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येईल.

"प्राधिकरणाकडून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीबाबत सूचना जारी झाल्या आहेत, त्याअनुषंगाने कारवाई करण्यात येत आहे. लवकरच तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडतील." -सचिन खैरनार, सहाय्यक निबंधक, नंदुरबार

Election of Agricultural Produce Market Committee
Nandurbar St Bus News : ताफ्यात नवीन एसटी बस लवकरच दाखल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()