Electricity Generation : ट्रॅक्टर डायनोमाचा जुगाड करीत वीजनिर्मिती; स्मार्ट आयडीयाने भागली कोंबड्यांची भुक

Electricity generation
Electricity generationesakal
Updated on

कापडणे : राज्यात बुधवारी (ता. ४) मध्यरात्रीपासून वीज कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या आणि खासगीकरणाविरोधात तीन दिवस संपाचे हत्यार उपसले. दुपारी हा संप मागे घेतला गेला. पण कापडणे ग्रामीणचे फीडर १६ तास बंद पडल्याने, ग्रामस्थांसह विविध व्यावसायिकांचे मोठे हाल झाले. काहींना आर्थिक झळही बसली.

पोल्ट्री व्यावसायिकांना अधिक फटका बसला. योगेश पाटील यांनी ट्रॅक्टर उपलब्ध करून त्याच्या डायनोमाने विजेची उपलब्ध केली अन् चक्क आठ तासांनंतर आठ हजार कोंबड्यांना खाद्य उपलब्ध झाले. सायंकाळी सहाला वीज पूर्ववत झाली. सोळा तास बत्तीगुल झाल्याने ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागला.

Electricity generation
Electricity workers strike: महावितरण कर्मचाऱ्यांना अडचणीत आणणारा Mesma  नेमका आहे तरी काय?

मध्यरात्रीपासून वीज कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला. येथील फीडर पहाटे तीनच्या सुमारास ट्रिप झाले. संप मागे घेतल्यानंतर सायंकाळी सहाला वीजपुरवठा पूर्ववत झाला. सोळा तास वीजपुरवठा बंद राहिल्याने येथे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली. शेतशिवारात रब्बी पिकांना पाणीपुरवठा झाला नाही. दोन्ही बॅंकांचे ऑनलाइन व्यवहार ठप्प झाले होते.

पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत

कापडणे व नंदाणे शिवारात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यावसायिक आहेत. दररोजचे खाद्य सकाळी दळल्यानंतरच कोंबड्यांना उपलब्ध होते. अचानक पुरवठा खंडित झाल्याने, व्यावसायिकांची मोठी धावपळ झाली. सहा तासांपेक्षा अधिक वेळ कोंबड्यांना खाद्य मिळाले नाही. रेडीमेड खाद्य आणून खाऊ घातले. पाण्यासाठीही कसरत करावी लागली.

Electricity generation
Electricity workers strike : महावितरण कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या आहेत तरी काय?

योगेश माळी यांनी केला जुगाड

येथील योगेश माळी यांच्या पोल्ट्रीत आठ हजारांपेक्षा अधिक पक्षी आहेत. सात हजार पक्षी नियमित अंडी देतात. दररोज ३५ हजारांचे उत्पादन आहे. एक टन मका दळून खाद्य उपलब्ध होते. वीज नसल्याने, माळी यांनी ट्रॅक्टर डायनामोचा वापर करून वीज उपलब्ध केली. त्यावर चक्की आणि वीजपंपही सुरू झाला. सुमारे आठ तासांनंतर खाद्य व पाणी उपलब्ध झाले. कोंबड्यांना टाकल्यानंतरच, त्यांनीही अन्नग्रहण केले. माळी यांनी वीज वितरणच्या बाबतीत तीव्र नाराजी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.