Nandurbar News : भुषा गावात प्रथमच पोहचली वीज! लख्ख प्रकाशामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण

Sarpanch Kushal Pavara along with wireman and villagers at the inauguration of Rohitra.
Sarpanch Kushal Pavara along with wireman and villagers at the inauguration of Rohitra.esakal
Updated on

Nandurbar News : तालुक्यातील नर्मदा नदी किनारी अतिदुर्गम डोंगराळ भागातील भुषा (ता. दडगांव) गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वीज पोहचली आहे. येथील ग्रामस्थांनी आपल्या स्वत:च्या गावात पहिल्यांदाच वीज पाहिल्याने व त्याद्वारे गावात पहिल्यांदाच लख्ख प्रकाश पाहून आनंद आणि समाधान व्यक्त केले आहे. (Electricity reached Bhusha village for first time Nandurbar News)

धडगांवपासून ४० किलोमीटर अंतरावर भुषा हे छोटेसे गाव वसलेले आहे. स्वातंत्र्यानंतर ७२ वर्षात प्रथमच महाराष्ट्र राज्य विज वितरण महामंडळ विभागामार्फत गावात प्रथमच वीज पोहचली.

भुषा हे गाव वर्षानुवर्षे रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, वीज आदी सोयी-सुविधांपासून वंचित राहिले आहे. भुषा गावाकडे स्थानिक प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी कधीच लक्ष न दिल्याने गाव विकासापासून कोसो दुर आहे.

आता मात्र गावातील युवक आधुनिक युगात उच्च शिक्षणाच्या आधारे गावाच्या विकासासाठी धडपड करीत असल्याने त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. त्यातून गावाच्या विकासाला सुरवात झालेली दिसून येत आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Sarpanch Kushal Pavara along with wireman and villagers at the inauguration of Rohitra.
Unemployed Youth Survey : बेरोजगार युवकांचे होणार सर्वेक्षण; राष्ट्रीय सेवा योजनेच्‍या माध्यमातून प्रक्रिया

भुषा गावातील खुटालीपाडा, हकतारा, विहिरपाडा, विमानतळपाडा, ओकायापाडा, भुषा पॉईंट आदी पाड्यांवरील ३० ते ४० लाभार्थ्यांना या वीजेचा लाभ होत आहे.

विद्युत रोहित्रच्या उद्‌घाटनावेळी भुषाचे सरपंच कुशाल पावरा, माळचे सरपंच जाड्या पावरा यांच्यासह लाला पावरा, नटवर पांडुरंग पावरा, दारख्या पावरा, फोपा पावरा, कारभारी पावरा, मेरसिंग पावरा, बोठड्या मालसिंग पावरा, किसन पावरा, कसा पावरा, पंडित पावरा, जेमा पावरा, गुमान खर्डे, युवराज पावरा, सुरत्या पावरा, वायरमन किर्ता पावरा व ग्रामस्थ उपस्थित होते.

Sarpanch Kushal Pavara along with wireman and villagers at the inauguration of Rohitra.
Weather Forecast : अवकाळीसह गारपीट सोडेना पाठ; आजपासून 4 दिवस मध्यम सरींचा अंदाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.