Employee Strike : आउटसोर्सिंग निर्णयाची होळी़; ॲड. सदावर्तेंचा पुतळाही दहन

employee strike old pension scheme Outsourcing Decision and Adv Sadavarte statue burned dhule news
employee strike old pension scheme Outsourcing Decision and Adv Sadavarte statue burned dhule newsesakal
Updated on

धुळे : जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी १४ मार्चपासून राज्यव्यापी संपावर आहेत. (employee strike old pension scheme Outsourcing Decision and Adv Sadavarte statue burned dhule news)

दरम्यान, कर्मचाऱ्यांचा संप बेकायदा असल्याबाबत अ‍ॅड. गुणवंत सदावर्ते यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्याच्या निषेधार्थ राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे शहरातील कल्याण भवन येथे अ‍ॅड. सदावर्ते यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. सदावर्ते मुर्दाबादसह ‘एकच मिशन-जुनी पेन्शन’ अशा घोषणा संपकरी कर्मचाऱ्यांनी या वेळी दिल्या.

तीन दिवसांपासून अठरा लाख राज्य सरकारी कर्मचारी संपात उतरले आहेत. याची नोंद घेत अ‍ॅड. सदावर्तेंनी त्यांच्याशी टक्कर घेऊ नये, असा इशारा समन्वय समितीचे निमंत्रक तथा राज्य कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी दिला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, एस. यू. तायडे, प्रतिभा घोडके यांच्यासह महिला कर्मचारी उपस्थित होते.

आउटसोर्सिंगच्या निर्णयाची होळी

दरम्यान, राज्य सरकारने आउट सोर्सिंगद्वारे नऊ कंपन्यांना एक लाख कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाचीही या वेळी होळी करण्यात आली. समन्वय समितीचे निमंत्रक डॉ. पाटील, श्री. तायडे, सुधीर पोतदार, माध्यमिक शिक्षक संघटनेचे संजय पवार, प्राथमिक शिक्षक समितीचे राजेंद्र पाटील, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे प्रा. बी. ए. पाटील यांच्या हस्ते शासनाच्या निर्णयाची होळी करण्यात आली.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

employee strike old pension scheme Outsourcing Decision and Adv Sadavarte statue burned dhule news
Unseasonal Rain : वादळी पावसाचा फटका; चोपडा तालुक्यात 485 हेक्टरवर पिकांचे नुकसान

या वेळी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना आपापल्या संघटनांच्या संवर्गाच्या, विभाग, कार्यालय, शाळा, महाविद्यायांमधील संपाबाबत आढावा व घडामोडींची माहिती देऊन बेमुदत संप यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे धोरण शासन जाहीर करीत नाही तोपर्यंत संप मागे घेण्याचा प्रश्नच नाही, सरकार जाणीवपूर्वक छोट्याछोट्या संघटनांना हाताशी धरून संप मागे घेतल्याच्या बातम्या पसरवून कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे, असे डॉ. पाटील म्हणाले. दरम्यान, शुक्रवारी (ता. १७) सकाळी दहाला कल्याण भवन येथून समन्वय समिती व जिल्हा परिषद कर्मचारी समितीचा संयुक्त मोर्चा निघेल. जेल रोड येथे मोर्चाची समारोपीय सभा होईल, असे डॉ. पाटील यांनी म्हटले आहे.

employee strike old pension scheme Outsourcing Decision and Adv Sadavarte statue burned dhule news
Dr. Ambedkar Statue : डॉ. आंबेडकर पुतळ्याबाबत विधिमंडळात उपमुख्यमंत्र्यांची दखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()