Employee Strike : सुरळीत कामकाजासाठी ‘हिरे’मध्ये तात्पुरती भरती

hire medical collage
hire medical collageesakal
Updated on

धुळे : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या (Employee Strike) बेमुदत संपाच्या पार्श्‍वभूमीवर येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील कामकाज सुरळीत चालू राहावे यासाठी गट क तांत्रिक व नर्सिंग संवर्गाची तब्बल १४४ रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. (employee strike Temporary recruitment in Government Medical College for smooth functioning dhule news)

ही पदे तात्पुरत्या स्वरूपात तातडीने बाह्यस्त्रोताने कंत्राटी तत्त्वावर भरण्यासाठी एनआयसी पोर्टलवर जाहीर प्रसिद्ध करावी अशी विनंती प्रभारी अधिष्ठातांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी १४ मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे विविध शासकीय कार्यालयांसह शासकीय रुग्णालयांच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. रुग्णालयीन कामकाज सुरळीत चालू राहावे यासाठी गट क तांत्रिक तसेच नर्सिंग संवर्गाची रिक्त पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

hire medical collage
Shivsena Executive : शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी डॉ. गावित, मोरे, महाले यांची नियुक्ती

संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालय तसेच सर्वोपचार रुग्णालयातील रिक्त पदांची संपकालावधीमध्ये अत्यावश्‍यक सेवेकरिता तातडीने बाहयस्रोताने कंत्राटी तत्त्वावर नियुक्तीकरिता (वॉक इन इंटरव्ह्यू) एनआयसीच्या पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करावी अशी विनंती हिरे वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मोरे यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

१४४ जागांसाठी भरती

श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात क्ष-किरण तंत्रज्ञ-१, रक्तपेढी तंत्रज्ञ-२, प्रयोगशाळा तंत्रज्ञ-५, प्रयोगशाळा सहाय्यक-१०. तसेच सर्वोपचार रुग्णालयात अधिपरिचारिका-१२१, क्ष-किरण तंत्रज्ञ-३, ईसीजी तंत्रज्ञ-१, प्रयोगशाळा तंत्रज्ञ-१ आदी पदांचा यात समावेश आहे. या पदांसाठी २० ते २५ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

संपानंतर नियुक्त्या संपुष्टात

ही पदे फक्त संपकाळापुरती मर्यादित कालावधीसाठी अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात भरण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचा संप संपुष्टात येताच देण्यात आलेल्या तात्पुरत्या स्वरूपातील नियुक्त्या कोणत्याही प्रकारच्या सूचना न देता आपोआप संपुष्टात येतील. नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवारास तत्संबंधी हमीपत्र कार्यालयास सादर करावे लागेल असे रुग्णालय प्रशासनाने नमूद केले आहे.

hire medical collage
Employee Strike : संपकरी कर्मचाऱ्यांचा धुळ्यात महामोर्चा; संप फोडण्याचा डाव पण...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.