Dhule News : रिक्त 1588 पदांसाठी उमेदवारांची निवड

Rojgar Melawa News
Rojgar Melawa Newsesakal
Updated on

धुळे : येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा परिषदेतर्फे ४ व ५ जानेवारीला रोजगार मेळावा होणार आहे. त्यात नाशिक, औरगांबाद, पुणे, मुंबई, धुळे जिल्ह्यातील दहा नामांकित उद्योगांकडून १५८८ रिक्त जागांसाठी भरती केली जाणार असल्याची माहिती केंद्राचे सहायक आयुक्त रा. नि. वाकुडे यांनी दिली.

शहरातील जेल रोडवरील शासकीय तांत्रिक विद्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत रोजगार मेळावा होईल. त्यात चार जानेवारीला फक्त महिला, तर पाच जानेवारीला पुरूष गटासाठी भरती प्रक्रिया पार पडेल.

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व उद्योजकता मेळाव्याअंतर्गत नाशिक, औरगांबाद, पुणे, मुंबई, धुळे जिल्ह्यातील दहा नामांकित उद्योगांचे अधिकारी त्यांच्याकडील रिक्त १५८८ जागांसाठी पात्र उमेदवारांची नियुक्ती करतील. (Employment fair from January 4 in Dhule Including ten named companies dhule news)

Rojgar Melawa News
Nashik Crime News : धोकादायकरीत्या गॅससिलिंडरची हाताळणी करणाऱ्या ‘त्या’ रिक्षाचालकावर गुन्हा दाखल

पात्र उमेदवारांची चाचणी व मुलाखती घेतली जाईल. नंतर विविध रिक्त पदांसाठीच्या जागांवर त्यांची निवड होईल. स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य करणारी शासनाची विविध महामंडळे मेळाव्यास्थळी स्टॉल लावणार आहेत.

त्यात कर्ज योजनांची माहिती व मार्गदर्शनही संबंधितांना केले जाईल. रोजगार मेळाव्यात नाशिकस्थित डाटा मॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेसमधील दीडशे पदे, औरंगाबादस्थित नवभारत फर्टिलायझरमधील ३८ पदे, नाशिक येथील यशस्वी अकाडमीत २०० पदे, धुळे येथील एसबीआय लाईफ इन्शुरन्समधील १५५ पदे, धुळे ग्रामीणमधील राज कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये ५०, तर केडिट एक्सेसमधील २०० पदे, मुंबईतील इम्परेटिव्ह बिझनेस वेंचर्समधील १०० पदे, धुळे प्रोसॉफट प्लेसमेंट्समधील १७५ पदे, स्पॉटलाईट कन्सल्टन्सीची २० पदे, मुंबईस्थित शुभम सर्व्हिसेसमधील ५०० पदे, इतर उद्योजकांकडील मिळून एकूण १५८८ रिक्तपदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाईल. यात रिक्त पदे वाढण्याची शक्यता असेल.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

Rojgar Melawa News
Dhule News : पांझरा पात्रातून वाळूची तस्करी; महसूल विभागाची डोळेझाक

इच्छुक उमेदवारांनी किमान पाच प्रतीत बायोडाटा व फोटो, आधारकार्ड, सेवायोजन नोंदणीसह उपस्थित रहावे. इच्छुकांनी अद्याप सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच यापूर्वी महारोजगार

वेबपोर्टलवर नोंदणी केली असल्यास संकेतस्थळावर आपला पंधरा अंकी नोंदणी क्रमांक भरून लॉगीन करावे आणि मोबाईल व आधार क्रमांकाची पडताळणी करावी. भरती इच्छुक नियोक्त्यांनी जास्तीत जास्त रिक्तपदे www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर

धुळे जॉब फेअर-३ (२०२२-२३) यावर नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी ०२५६२- २९५३४१ या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा, असे आवाहन श्री. वाकुडे यांनी केले.

Rojgar Melawa News
Jalgaon News : Thirty First वरील नियंत्रणासाठी 2 पथके

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.