Dhule News : ‘पीडब्ल्यूडी’, ‘मनपा’तर्फे सलग दुसऱ्या दिवशी कारवाई; अतिक्रमणांमुळे अदृश्‍य गटारी निष्कासनातून मोकळ्या

Municipal team breaking the encroachment on the road between Tehsil Office and Rajwade Bank and lifting tapri with the help of crane.
Municipal team breaking the encroachment on the road between Tehsil Office and Rajwade Bank and lifting tapri with the help of crane.esakal
Updated on

Dhule News : सार्वजनिक बांधकाम व महापालिका यांच्या संयुक्त पथकाद्वारे अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई मंगळवारी (ता. ३१) सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिली.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने शहराच्या देवपूर भागातील स्वागत लॉज ते पंचवटी व धुळे महापालिकेच्या पथकाने शहरातील तहसील कार्यालय ते राजवाडे बँकेदरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने हटविली. ( Encroachment action by PWD and municipal corporation for second day dhule news)

महापालिकेच्या पथकाने सात-आठ टपऱ्याही जप्त केल्या. रस्त्यालगतच्या या अतिक्रमणात देवपूर भागात प्रामुख्याने गटारावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे करून गटारीच अदृश्‍य केल्याचे समोर येत आहे.

शहरातील मुख्य रस्त्यांवरच्या अतिक्रमणाचा प्रश्‍न गंभीर झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सार्वजनिक बांधकाम व धुळे महापालिकेकडून अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी ही मोहीम सुरू राहिली. यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने व मनपा कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सोमवारी अर्धवट राहिलेली कारवाई पूर्ण केली.

यात स्वागत लॉज ते पंचवटीदरम्यानच्या अतिक्रमणांवर जेसीबी फिरविण्यात आला. शेड, पायऱ्या, ओटे, टपऱ्या आदींच्या माध्यमातून रस्त्यावर केलेले अतिक्रमण हटविण्यात आले. सर्व ४० कर्मचाऱ्यांच्या पथकाने एकत्रितपणे कारवाई करून मंगळवारी सुमारे २००-२५०, तर दोन दिवसांत सुमारे हजारावर अतिक्रमणे हटविल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे महामार्ग प्राधिकारी तथा उपविभागीय अभियंता धर्मेंद्र झाल्टे यांनी सांगितले.

Municipal team breaking the encroachment on the road between Tehsil Office and Rajwade Bank and lifting tapri with the help of crane.
Dhule News : शॉर्टसर्किटमुळे घराला आग संसारोपयोगी साहित्य जळून खाक

गटारांवर अतिक्रमणे

देवपूर भागातील जुन्या आग्रा रोडवर प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर गटारांवर अतिक्रमणे करण्यात आल्याचे यानिमित्ताने समोर आले. गटारांवर स्लॅब ओतून अथवा टपरी, पायऱ्या, ओटे करून गटारी अदृश्‍यच करण्यात आल्या. त्यामुळे या गटारी मोठ्या प्रमाणावर तुंबलेल्या आढळून आल्या. अतिक्रमण काढल्याने या गटारी आता मोकळ्या झाल्या आहेत. पुन्हा त्यावर अतिक्रमणे होणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे.

टपऱ्या जप्त, दुकाने काढली

धुळे महापालिकेच्या पथकाने शहरातील तहसील कार्यालय ते राजवाडे बँकदरम्यानच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील अतिक्रमणांवर जेसीबी फिरविला. या भागात पथकाने शेड, पायऱ्या, ओटे, टपऱ्या हटविल्याच शिवाय दोन मोठ्या दुकानांवरही जेसीबी फिरविला. या कारवाईत सात-आठ टपऱ्याही पथकाने क्रेनच्या सहाय्याने उचलून त्या वाहनात टाकून जप्त केल्या. मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकप्रमुख प्रसाद जाधव व पथकाने ही कारवाई केली.

आज आग्रा रोडवर कारवाई

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकामार्फत बुधवारी (ता. १) शहरातील महात्मा गांधी पुतळा, फुलवाला चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यादरम्यान अर्थात संपूर्ण आग्रा रोडवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. वेळ राहिल्यास गुरुद्वारापर्यंत ही कारवाई पुढे केली जाणार आहे.

Municipal team breaking the encroachment on the road between Tehsil Office and Rajwade Bank and lifting tapri with the help of crane.
Dhule Crime News : अवैध गोमांस वाहतूक सोनगीर येथे पकडली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.