Dhule News : सर्व 96 अतिक्रमणे अखेर जमीनदोस्त; इतरही अतिक्रमणांवर जेसीबी फिरणार

The municipal team while moving the JCB on the remaining encroachments in the Khadipatti area on Wednesday.
The municipal team while moving the JCB on the remaining encroachments in the Khadipatti area on Wednesday. esakal
Updated on

Dhule News : शहरातील खड्डीपट्टी भागातील अतिक्रमण निर्मूलन मोहीम अखेर बुधवारी (ता. ३) पूर्ण झाली. या भागात तब्बल ९६ अतिक्रमणे होती. गेल्या दोन दिवसांपासून महापालिकेतर्फे येथे अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम सुरू होती. (Encroachment removal campaign in Khaddipatti area All 96 encroachment were removed dhule news)

दरम्यान, यानंतरही टप्प्याटप्प्याने अतिक्रमणे काढण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पावसाळ्यापूर्वी नाला काठावरील रहिवाशांना आपापली अतिक्रमणे हटविण्याबाबत महापालिकेकडून नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू आहे.

शहरातील चाळीसगाव रोड परिसरातील खडीपट्टी भागात बडेमिया हकेमिया हॉल ते पूर्व हुडको नाल्यादरम्यान मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली होती. यात रस्त्यापैकी जागेवर तसेच काही खासगी जागांवर अतिक्रमणे होती. काही खासगी व्यक्ती याविरोधात न्यायालयातही गेल्या होल्या.

न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर महापालिकेकडून अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई अपेक्षित होती. गेल्या अनेक महिन्यांपासून हे प्रकरण प्रलंबित होते. महापालिकेने शहरातील अतिक्रमण निर्मूलनाचा कार्यक्रम हाती घेतल्यानंतर या भागातील अतिक्रमणांचा विषयालाही गती मिळाली. दरम्यानच्या काळात सण-उत्सवांमुळे पुन्हा कारवाईला ब्रेक लागला होता. यानंतर मात्र महापालिकेने कारवाई पुन्हा सुरू केली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

The municipal team while moving the JCB on the remaining encroachments in the Khadipatti area on Wednesday.
Kumbh Mela 2027 : साधूग्राम भूसंपादनासाठी मागविला अहवाल; शासनाकडून सिंहस्थाची तयारी सुरू

दोन दिवसांत कारवाई पूर्ण

महापालिकेने या भागातील संबंधित अतिक्रमणधारकांना काही दिवसांपूर्वीच नोटिसा बजावून आपापली अतिक्रमणे हटविण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर महापालिकेकडून कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवार (ता. २)पासून महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरू केली.

पहिल्या दिवशी सुमारे ५०-६० अतिक्रमणे काढण्यात आली. उर्वरित अतिक्रमणांवर बुधवारी जेसीबी फिरविण्यात आला. बुधवारी एका जेसीबीच्या सहाय्याने उर्वरित सुमारे ४० अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथकप्रमुख प्रसाद जाधव व पथकाने ही कारवाई केली.

The municipal team while moving the JCB on the remaining encroachments in the Khadipatti area on Wednesday.
ZP Staff Transfer : ठरलं..16 मे पासून कर्मचाऱ्यांच्या बदल्या; असे आहे बदल्यांचे वेळापत्रक...

नोटिसा बजावणे सुरू

दरम्यान, येत्या दोन दिवसांत चाळीसगाव रोड भागातील एका वॉल कंपाउंडचे अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले. संबंधित प्रकरणातही न्यायालयाचा आदेशाने ही कारवाई केली जाणार आहे. याशिवाय टप्प्याटप्प्याने शहरातील इतरही भागात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई सुरू राहील.

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालाकाठावरील अतिक्रमणे हटविण्याची प्रक्रियाही महापालिकेकडून सुरू आहे. सुशी नाल्यावरील अतिक्रमणधारकांना जाहीर नोटिशीद्वारे आपापली अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले. याशिवाय महापालिकेकडून वैयक्तिक स्वरूपातही नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू आहे. शहरात विविध भागात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाल्याचे दिसते.

अनेक ठिकाणी तर त्या-त्या प्रभागातील नगरसेवकांनी महापालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. त्यानंतरही संबंधित अतिक्रमणे हटविली गेलेली नाहीत. दरम्यान, आता प्रशासनाने सर्व अतिक्रमणांवर कारवाईचे आश्‍वासन दिल्याने संबंधित अतिक्रमणे हटतील, अशी अपेक्षा आहे. काही ठिकाणी महापालिकेच्या जागेवर इतरांनी अतिक्रमणे करून व्यावसायिक वापर सुरू केला आहे, अशा अतिक्रमणांवर प्राधान्याने कारवाईची गरज व्यक्त होते.

The municipal team while moving the JCB on the remaining encroachments in the Khadipatti area on Wednesday.
NEET Exam : ‘नीट’ परीक्षेला 12 हजार विद्यार्थी जाणार सामोरे; 20 केंद्रांवर ऑफलाइन परीक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.