Dhule News : धुळे येथील सैनिकी मुलांच्या वसतिगृहात प्रवेशासाठी आवाहन

army school
army schoolesakal
Updated on

धुळे : शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये शिक्षण घेत/घेणार असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सैनिकी मुलांच्या वसतिगृहामध्ये प्रवेशप्रक्रियेसाठी नावेनोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. (enrollment process for admission process in military children hostel has started dhule news)

धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील आजी/माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी तसेच इतर नागरिकांनी आपल्या पाल्यासाठी वसतिगृहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड यांनी केले.

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधीनस्त सैनिकी मुलांचे वसतिगृह हे धुळे येथे मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाजूला आहे. वसतिगृहात आजी/माजी सैनिकांची पाल्ये जी आठवीपासून पुढील अभ्याक्रमांचे शिक्षण घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांना माफक शुल्क आकारून प्रवेश दिला जातो.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

army school
Vaccination Drive : लाळ खुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण करण्याचे आवाहन

या वसतिगृहात राहणे, भोजनाची उत्तम व्यवस्था असून, वाय-फाय, व्यायामाचे साहित्य व पुस्तकालय उपलब्ध आहे.

वसतिगृहात कार्यरत कर्मचारी सैन्य सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी असल्याने त्यांच्याकडून वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम शिस्त व मार्गदर्शन केले जाते. अधिक माहिती ०२५६२-२३७२६४/२३७६०७, ९७६५३३३४८८/९२७०२०८४०८/७०२०२६४९४० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.