Dhule News : धुळे बाजार समितीत परराज्यांतून बाजरी दाखल; रोज 500 ते हजार क्विंटल आवक

bajara submitted to Agricultural Produce Market Committee
bajara submitted to Agricultural Produce Market Committeeesakal
Updated on

धुळे : निसर्गाच्या लहरीपणामुळे काही वर्षांपासून जिल्ह्यात बाजरीचे उत्पादन घटल्याचे दिसते. यंदाही तसेच चित्र असले तरी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत परराज्यातूनही मोठ्या प्रमाणावर बाजरी विक्रीसाठी येत आहे. रोज साधारण पाचशे ते हजार क्विंटल बाजरीची आवक आहे. हिवाळा सुरू झाल्याने ग्राहकांकडूनही बाजरीला चांगली मागणी असल्याचे पाहायला मिळत आहे. (Entry of bajara from foreign states in Dhule Bazar Committee 500 to thousand quintals daily income Latest Dhule News)

 दुसऱ्या छायाचित्रात बाजरी खरेदीसाठी आलेली महिला.
दुसऱ्या छायाचित्रात बाजरी खरेदीसाठी आलेली महिला. esakal

यंदा अतिवृष्टीमुळे स्थानिक शेतकऱ्यांचे धान्यांचे उत्पादन घटले. बाजरीही काळी पडली. परिणामी या काळ्या बाजरीची विक्री होत नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. उत्तर महाराष्ट्रात पावसाळी बाजरीचे उत्पादन घटल्याने बाजार समितीतही स्थानिक शेतकऱ्यांकडील बाजरीची आवक कमी आहे. मात्र बाजार समितीत सध्या राजस्थान, गुजरात, हरियाना, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातून शेतकरी बाजरी विक्रीसाठी येत आहेत. हॉटेल व्यावसायिक, स्थानिक नागरिकांकडून बाजरीला सध्या चांगली मागणी आहे.

ग्रामीण व गरीब कुटुंबांमध्ये बाजरी नियमित आहाराचा भागत आहे. शहरी भागातील मध्यमवर्ग, नोकरदार वर्गात मात्र हद्दपार झाल्यागत स्थिती होती. मात्र, गेल्या काही वर्षांत आहाराबाबत अधिक जागरूकता निर्माण झाल्याने व बाजरीची उपयोगिता लक्षात आल्याने तसेच आहारतज्ज्ञ, डॉक्टरांकडूनही आता गव्हाबरोबरच बाजरी, दादर व इतर धान्याचा उपयोग करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे आता शहरी भागातही बाजरी खाणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाजरी खरेदीसाठी अनेक नागरिक बाजार समितीत जात असल्याचेही पाहायला मिळते.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

bajara submitted to Agricultural Produce Market Committee
Nashik News : रामतीर्थाला गरज ‘Smart' महिला वस्त्रांतरगृहांची!

आवक वाढली

बाजरीचा भाव प्रतिकिलो ५ ते २० रुपयांवरून २४ ते २७ झाला. किरकोळ बाजारात हा भाव ३० ते ३५ रुपयांपर्यंत आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, हरयाणा, मध्य प्रदेशमधून रोज सुमारे पाचशे ते हजार क्विंटल बाजरीची आवक होत आहे. मंगळवारी (ता. २९) बाजार समितीत बाजरीला किमान दोन हजार ४०० ते कमाल दोन हजार ७०० रुपये क्लिंटल भाव मिळाला.

बाजरीची भाकरी खासच

धुळ्यासह इतर अनेक शहरांमध्ये ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांचेच वास्तव्य आहे, त्यामुळे तरुण मंडळी सोडली तर या कुटुंबांना बाजरीच्या भाकरीविषयी एक वेगळी ओढ असल्याचेही दिसते. शिवाय आरोग्याच्या दृष्टीनेही बाजरीचे महत्त्व आता नव्या पिढीलाही समजू लागल्याने ग्राहकांकडून बाजरी खरेदीचे प्रमाण वाढत आहे. सध्या हिवाळा सुरू झाल्याने बाजरीच्या मागणीत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. एकूणच वर्षानुवर्षे गरिबांचे धान्य असा शिक्का बसलेली बाजरी आता मात्र गव्हालाही भारी ठरत आहे. ‘चुलीवरच्या भाकरी’ने तर आता सर्व हॉटेल्समध्ये ‘खास मेन्यू’मध्ये स्थान पटकावले आहे.

"बाजार समितीत परराज्यांतून बाजरीची आवक सुरू आहे. रोज वीस ते पंचवीस ट्रक आवक होत आहे. वाहतूक खर्च, स्थानिक अत्यल्प उत्पादन व मागणी वाढल्याने बाजरीच्या भावात वाढ झाली आहे. फेब्रुवारीपर्यंत हे दर चढेच राहतील असा अंदाज आहे."

-अशोक वाघ, व्यापारी, बाजार समिती, धुळे

bajara submitted to Agricultural Produce Market Committee
Nashik Postal Department : नाशिक टपाल विभाग राज्यात ठरला अव्वल!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()