Dhule Onion News : कांदा अनुदानासाठी धुळ्यात समितीची स्थापना

Dhule Onion News : कांदा अनुदानासाठी धुळ्यात समितीची स्थापना
esakal
Updated on

Dhule Onion News : शासनाच्या सहकार, पणन, व वस्त्रोद्योग विभागाच्या २७ मार्च २०२३ च्या निर्णयान्वये २०२२-२०२३ या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या कांद्यास प्रतिक्विंटल ३५० रुपये व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रतिशेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे.

या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा व तालुकास्तरावर समिती नेमण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांनी दिली. (Establishment of Committee in Dhule for Onion Subsidy news)

जिल्हास्तरावरील तक्रारींचे निवारण करण्यासाठी संबंधित जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या अध्यक्षतेखालील समितीत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था हे अध्यक्ष असतील. जिल्हा विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था हे सदस्य असतील तसेच सहाय्यक निबंधक (प्रशासन) सहकारी संस्था हे सदस्य सचिव राहतील.

तालुकास्तरावरील तक्रारींचे निवारण करण्यासाठी तालुका उपनिबंधक, सहकारी संस्थाच्या अध्यक्षतेखालील समितीत तालुका उपनिबंधक सहकारी संस्था हे अध्यक्ष असतील, तर तालुका लेखापरीक्षक, सहकारी संस्था हे सदस्य असतील तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सदस्य सचिव असतील.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dhule Onion News : कांदा अनुदानासाठी धुळ्यात समितीची स्थापना
NAFED Onion Purchase : कांद्याची ‘नाफेड’कडून 'या' अटींवर खरेदी; जाचक अटी घातल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

तालुकास्तरावर प्राप्त झालेल्या तक्रारींचे निवारण न झाल्यास जिल्हास्तरावर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीत तक्रारीचे निवारण करण्यात येईल.

जिल्हास्तरीय समितीने दिलेला निर्णय अंतिम राहील. अनुदानाबाबत धुळे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काही तक्रारी, अडचणी असल्यास संबंधित उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. चौधरी यांनी केले.

Dhule Onion News : कांदा अनुदानासाठी धुळ्यात समितीची स्थापना
Onion Export News : निर्यातशुल्क वाढीचा व्यापाऱ्यांना फटका! जेएनपीए बंदरात सडला ८०० टन कांदा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()