Exclusive Story : फुलशेतीतून आयुष्यही बहरले!

Ranmala: Farmer Deepak Gawde pruning roses on Wednesday. Prasad Gawde picking marigolds in the second picture
Ranmala: Farmer Deepak Gawde pruning roses on Wednesday. Prasad Gawde picking marigolds in the second pictureesakal
Updated on

धुळे : नशिबाला कोसण्यापेक्षा माती आणि बेभरवशाच्या निसर्गाशी जुगार खेळत रानमळा (ता. धुळे) येथील दीपक गावडे या शेतकऱ्याने दहा वर्षांपूर्वी फुलशेतीला सुरवात केली. त्यास कमी झोप आणि ढोरमेहनतीची जोड दिली.

असे काबाडकष्ट पाहून निसर्गदेवता प्रसन्न झाली. तिने गावडे परिवाराच्या झोळीत वार्षिक सरासरी २० ते २५ लाखांची उलाढाल अन्‌ आठ ते दहा लाख रुपयांच्या वैयक्तिक नफ्याचे दान टाकले. त्यामुळे फुलशेतीतून शेतकरी गावडे यांचे आयुष्यही बहरले आहे. (Exclusive Story under Flower Farming Annual turnover of Gawde is 25 lakhs Life bloomed from flower farm Dhule News)

Ranmala: Farmer Deepak Gawde pruning roses on Wednesday. Prasad Gawde picking marigolds in the second picture
Nashik Political News : आगामी निवडणुकीत भाजप- सेना युतीचा भगवा; मुख्यमंत्र्यांना दिला शब्द

धुळे शहरालगत मोहाडी उपनगरमार्गे सात किलोमीटरवरील रानमळा येथील गावडे यांची ही यशोगाथा आहे. वडील पूर्वी शहरातील प्रताप मिलमध्ये गेटकीपर होते. त्यामुळे दीपक गावडे हेही मिलमध्ये कामाला होते. ते दोघे भाऊ आणि परिवाराची एक हेक्टर ६२ आर शेतजमीन होती. कालांतराने ती सावकाराच्या ताब्यात गेली. कमी मिळकतीमुळे दीपक गावडे यांनी स्वतंत्र उद्योग-व्यवसायातून रोज दोन-चारशे रुपयांची मिळकत झालीच पाहिजे, असे ठरविले. त्यांनी धाडसाने दहा वर्षांपूर्वी फुलशेतीत पाय रोवले.

प्रयोगशीलतेला कष्टाची जोड

सावकाराकडून शेतजमीन सोडविली. बेभरवशाचा पाऊस, अतिवृष्टी, सहा-सहा महिन्यांनी पीक बदलणे त्यांना पसंत नव्हते. यात एकर-दीड एकरात फुलशेती सुरू केल्यावर आता आणखी दीड एकर म्हणजेच मालकीची एकूण तीन एकर, शिवाय दुसऱ्याची दीड एकर शेती त्यांनी खेडायला घेतली आहे. सुरवातीला त्यांची गुलाबाची हजार झाडे होती, ती आता पाच ते दहा हजारांपर्यंत नेली आहेत. पहाटे पाचला उठणे, प्राणायामानंतर सकाळी साडेसहा- सातला शेतात गेल्यावर ते सायंकाळी सातनंतर घरी परततात.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

Ranmala: Farmer Deepak Gawde pruning roses on Wednesday. Prasad Gawde picking marigolds in the second picture
Nashik News : गोदावरीच्या पूररेषेत बांधकामाचा मलबा; हरित लवादाची महापालिकेला नोटीस

छाटणीपासून विक्रीपर्यंत...

हंगामानुसार फुले घेताना श्री. गावडे विविधरंगी गुलाब, शेवंती, निशिगंध, मोगरा, ग्लॅडर, झेंडू, बिजली, गुलछडी असे आठ ते दहा प्रकारच्या फुलांचे उत्पादन घेतात. कारले, दुधीभोपळा आदी फळभाज्यांचे मांडव पद्धतीने उत्पादन घेतात. दुचाकीने रोज पितापुत्र दीपक व प्रसाद गावडे हे धुळे शहरात ठिकठिकाणी बंदीच्या आठ ते दहा विक्रेत्यांकडे फुलांचा माल पोचवितात. तसेच शिंदखेडा, झोडगे, मालेगाव, जळगाव आदी ठिकाणी व्यापाऱ्यांना माल देतात. रानमळ्यापासून पाच किलोमीटरवरील धरणातून जलवाहिनीने पाणी आणून आणि विहिरीसह ठिबक सिंचनाच्या माध्यमातून गावडे यांनी फुलशेती फुलविली आहे.

गावडे यांचा आदर्श

औषधे, फवारणी, खत, मजुरी यासह फुले उत्पादक शेतकरी गावडे यांची वार्षिक सरासरी २० ते २५ लाखांची उलाढाल आहे. त्यात त्यांना वार्षिक सरासरी आठ ते दहा लाखांचा नफा मिळतो. ते रोज किमान चार, तर मोगरा व इतर काही फुले छाटणीसाठी दहा ते बारा मजुरांना रोजगार देतात. कारची हौस त्यांनी भागविली आहे. त्यांची ही यशोगाथा अनुकरणीय ठरते.

Ranmala: Farmer Deepak Gawde pruning roses on Wednesday. Prasad Gawde picking marigolds in the second picture
Dhule Crime News : अवैध वाळूचा ट्रॅक्टर पकडला; मालक, चालकाविरोधात वाळूचोरीचा गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.