Onion Subsidy : कांदा अनुदानासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; या तारखेपर्यंत आहे संधी

Onion Subsidy
Onion Subsidyesakal
Updated on

Onion Subsidy : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने साडेतीनशे रुपये प्रती क्विंटल अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुदानासाठी अर्ज करण्यासाठी ३० एप्रिल २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या मुदतीत शेतकऱ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मनोज चौधरी यांनी केले आहे. (Extension of time to apply for Onion Subsidy opportunity until 30 april date dhule news)

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या शासन निर्णयान्वये १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या कांद्यास प्रती क्विंटल साडेतीनशे रुपये व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

त्यानुसार पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी अनुदान मागणी अर्ज स्वीकारण्यासाठी ३० एप्रिल २०२३ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ज्या शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी बाजार, थेट पणन परवानाधारक, नाफेडकडे लेट खरीप लाल कांदा विक्री केलेला आहे.

त्या शेतकऱ्यांनी कांदा अनुदान मागणी अर्ज ३० एप्रिलपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत असे आवाहन जिल्हा उपनिबंधक श्री. चौधरी यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Onion Subsidy
Dr. Bharati Pawar : शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी जागृत व्हा : डॉ. भारती पवार

अर्जासोबत ही कागदपत्र जोडा

कांदा अनुदान मागणी अर्ज (कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी बाजार, थेट पणन परवाना धारक, नाफेडकडे व तालुका उप/सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयामध्ये विनामूल्य मिळेल), विक्री केलेल्या कांदा विक्रीची मुळपट्टी, कांदा पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा, बँक पासबुकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत (खाते क्रमांक व आयएफएसी कोडसह), आधारकार्डची झेरॉक्स प्रत, सहमती असणारे शपथपत्र.

दरम्यान, ज्या प्रकरणात सातबारा उतारा वडिलांच्या नावे व विक्रीपट्टी मुलाच्या व अन्य कुटुंबीयांच्या नावे आहे व सातबारा उताऱ्यावर पीक पाहणीची नोंद आहे अशा प्रकरणात वडील व मुलगा व अन्य कुटुंबीय यांनी सहमतीचे शपथपत्र अर्जासोबत जोडावे.

याबाबत सातबारा उतारा ज्यांचे नावे असेल त्यांच्या बॅक बचत खात्यामध्ये अनुदान जमा केले जाईल असेही जिल्हा उपनिबंधक श्री. चौधरी यांनी म्हटले आहे.

Onion Subsidy
Teacher Special Train : मुंबई- बनारससाठी टीचर्स स्पेशल ट्रेन!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()