Dhule News : वीजग्राहकांना तक्रारीसाठी सुविधा

Dhule News
Dhule News esakal
Updated on

धुळे : नाशिक येथील ग्राहक मंच, धुळे ग्राहक फाउंडेशन, पुणे येथील ग्राहक कल्याण फाउंडेशनतर्फे विद्युत कायदा २००३ व ग्राहक गाऱ्हाणी निवारण मंचाबाबत जनजागृतीचा नुकताच कार्यक्रम झाला.

न्या. अजय भोसरीकर अध्यक्षस्थानी होते. दीप्ती गायकवाड, अॅड. चंद्रकांत येशीराव, ईश्‍वर बारी, ग्राहक संघटनेचे प्रतिनिधी भरत अग्रवाल, अॅड (Facility for complaints to electricity consumers Dhule News )

Dhule News
Dhule Marathon News : धुळे मॅरेथॉन तयारी; विजेत्यांना 2 लाखांची बक्षिसे

अमित दुसाने, डॉ. संजय गोसावी आदी उपस्थित होते. न्या. भोसरीकर यांनी विद्युत कायदा २००३ नुसार ग्राहक मंचाचे कामकाज चालते, वीजग्राहकांनी टोल फ्री १९१२ क्रमांकावर तक्रार करावी किंवा

महावितरणचे ॲप डाउनलोड करून मोबाईलद्वारे तक्रार केल्यास तरतुदीप्रमाणे ६०दिवसांत ग्राहकांना न्याय मिळतो, तातडीची सुनावणी घेता येते, अंतरिम आदेश पारित करता येतो, असे सांगितले.

शहरी व ग्रामीण भागातील सर्व वीजग्राहक तक्रारी या फोरममध्ये चालू शकतात. वीजचोरीची तक्रार चालविण्याचा अधिकार या फोरममध्ये नाही. ग्राहकांना तक्रार करताना कोणताही खर्च येत नाही. तसेच वकील लावण्याची आवश्यकता नाही.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

Dhule News
Dhule News : रोजगार हमी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

ग्राहक स्वतः ही तक्रार चालवू शकतो किंवा त्यांचे म्हणणे लेखी स्वरूपात मांडू शकतो. ग्राहक फोरमला कुठलीही आर्थिक मर्यादा नाही. त्यामुळे कितीही रकमेची तक्रार या फोरमकडे चालू शकते. ग्राहक राजा आहे, मात्र त्याने आपल्या अधिकार व कर्तव्याची जाणीव ठेवावी.

अन्याय, अत्याचाराबाबत ग्राहक गाऱ्हाणी निवारण मंचाकडे तक्रार करावी, असेही न्या. भोसरीकर यांनी सांगितले. त्यांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. ग्राहक फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. चद्रकांत येशीराव यांनी प्रास्ताविक केले. रोशनी सैंदाणे यांनी सूत्रसंचालन केले. गायत्री शिरसाट यांनी आभार मानले.

Dhule News
Dhule News | धुळे जिल्ह्याला 75 कोटी वाढीव निधी द्या : आमदार जयकुमार रावल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.