Dhule News : चालक, मालकांचे फागणे-बाळापूर!

Truck News
Truck Newsesakal
Updated on

नवलनगर : असंख्य गावांना काही एक ओळख असते. तशी ती वाहनचालक, मालकांनी फागणे व बाळापूरला (ता. धुळे) मिळवून दिली आहे. निरनिराळी वाहने, ट्रक व्यवसाय आणि चालकांच्या उपलब्धतेत फागणे, बाळापूर अग्रेसर आहे.

या कामावरील निष्ठा, कष्ट उपसण्याची तयारी आणि व्यवसायातील अनुभव या शिदोरीवर या गावांमध्ये दुसरी पिढी कार्यरत असताना तिसऱ्या पिढीतील तरुणाई ही परंपरा जोपासण्यासाठी सरसावली आहे. (Fagane Balapur is leading in availability of vehicles in truck business and drivers Dhule News)

Truck News
Nashik News : शहराच्या सुरक्षिततेसाठी ‘एक सीसीटीव्ही’; पोलिस आयुक्तांचे व्यापाऱ्यांना आवाहन

धुळे शहरापासून पूर्वेला सरासरी पाच ते सहा किलोमीटरवर बाळापूर, फागणे आहे. यात ट्रकचालक व मालकांची मोठी संख्या आहे. तसेच अनेकांना खासगी वाहनासाठी चालक (ड्रायव्हर) उपलब्ध होत असतात. या गावांमध्ये सरासरी १९६५ ते १९७० पासून सर्व समाजांतून चालकासह ट्रक, ट्रान्स्पोर्टचा स्वीकार झाला आहे.

सुरवातीला ३० हजार किमतीचे ट्रक, निरनिराळ्या वाहनांपासून व्यवसायाला सुरवात झाली. या दोन्ही गावांत आज ४० ते ४५ लाख किमतीचे ट्रक, निरनिराळ्या वाहनांसह १४/१६ टायर्सची अवजड वाहने आहेत.

एकूण पाचशेवर वाहने

फागणे, बाळापूरमध्ये आजमितीस एकूण पाचशेवर ट्रक, ट्राला, चारचाकी वाहने आहेत. पूर्वी जे चालक म्हणून काम करायचे ते आता दोन ते तीन ट्रकचे मालक आहेत. या व्यवसायातील बदल स्वीकारत सहा ते सोळा टायर्सपर्यंतची मालवाहतुकीची वाहने या गावांमध्ये दिसतात. यात जीपीएस सिस्टिममुळे मालकास घरबसल्या आपले वाहन कोणत्या मार्गाने कुठे जात आहे याची माहिती असते. या व्यवसायातून फागणे, बाळापूरमध्ये मोठी उलाढाल होते. त्यातून रोजगाराला संधी मिळाली आहे. दसरा व लक्ष्मीपूजनाला वाहनपूजनातून सोहळा साजरा केला जातो.

Truck News
Gautam Adani News : आधी वीज, मग गॅस, आता गौतम अदानी पोहोचवणार प्रत्येक घरात...

वाहतूक अन्‌ संघटना

फागणे-बाळापूर येथील निरनिराळी वाहने महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि देशात ठिकठिकाणी कापूस, गहू, बाजरी, कडधान्य, शेंगदाणा, फरशी, मार्बल, ढेप आदी निरनिराळी कृषी उत्पादित, व्यापारी मालाची नियमित ने-आण करतात. मालक, चालक मंडळी एकमेकांशी नाते टिकवत मदतीसाठी उभे राहातात.

बँकांच्या मदतीने निष्ठेने व्यवसाय वृद्धिंगत करतात. त्यांनी गेल्या दहा-बारा वर्षांपासून धुळे जिल्हा ग्रामीण मोटरमालक संघटनेची स्थापना केली आहे. अध्यक्षपदी मधुकर पाटील, उपाध्यक्षपदी दिलीप पाटील आणि भास्कर सूर्यवंशी, मनोज पाटील, छगन सूर्यवंशी, प्रशांत वाणी, किशोर वाणी, रमेश वाणी, शिवाजी वाणी, राकेश पाटील आदी सदस्य आहेत.

"फागणे, बाळापूर येथे ज्येष्ठांसोबत तरुण वर्ग वाहन व्यवसायात उतरला आहे. तिसरी पिढी चांगल्या पद्धतीने व्यवसाय सांभाळत आहे. दर वर्षी वाहनांची संख्या वाढत आहे. या दोन गावांसह काळखेडे, मुकटी, अजंग येथे ट्रकची संख्या वाढत आहे. महामार्गालगत ही गावे असल्याने या व्यवसायाला फायदा होतो. सर्वच क्षेत्रांत दरवाढ झाली. तशी वाहतूक खर्चात दरवाढीची अपेक्षा आहे."

-मधुकर देवराम पाटील, अध्यक्ष, धुळे जिल्हा ग्रामीण मोटारमालक संघटना

Truck News
Jalgaon News : बाजार समितीतर्फे अवैध दुकाने बांधण्यास परवानगी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.