Dhule Fake Doctors : साक्री तालुक्यात बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले

धुळे येथील पोलिसांनी चार बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारला असून, यात येथील गोपालनगरमधील दोन, उंभरे (ता. साक्री) येथील एक व वार्सा (ता. साक्री) येथील एकाचा समावेश आहे.
Material seized by the police from fake doctors including medicinal pills.
Material seized by the police from fake doctors including medicinal pills.esakal
Updated on

Dhule Fake Doctor : येथील पोलिसांनी चार बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारला असून, यात येथील गोपालनगरमधील दोन, उंभरे (ता. साक्री) येथील एक व वार्सा (ता. साक्री) येथील एकाचा समावेश आहे. त्यांच्याकडे औषधे, गोळ्या व साहित्य मिळाले.

या कारवाईमुळे तालुक्यातील बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी केली आहे. (fake doctors in Sakri taluka, dhule news)

या कारवाईत राकेश प्रकाश पाटील (मूळ गाव मंहिदळे, ता. पारोळा, ह.रा. गोपाळनगर, पिंपळनेर, ता. साक्री), योगेश चंद्रकांत पाटील (मूळ रा. विरार, कल्याण, ह.मु. गोपाळनगर, पिंपळनेर), संभाजी माधवराव सोनवणे रा. उंभरे (ता. साक्री), आशित अमूल्यरतन विसवास (मूळ रा. मध्य प्रदेश, ह.मु. वार्सा) यांना ताब्यात घेतले.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आढावा बैठकीदरम्यान धुळे जिल्ह्यात बोगस डॉक्टरांच्या सुळसुळाटाने नागरिक त्रस्त असल्याने कारवाईसाठी पोलिसांसमोर आव्हान असल्याचे व कारवाईची अपेक्षा होत असल्याने प्रभारी अधिकाऱ्यांना आपापल्या पोलिस ठाणे हददीत सक्तीने माहिती काढून प्रभावी कारवाईचे आदेश व मार्गदर्शक सूचना केली होती.

गुरुवारी (ता. ४) श्री. पारधी यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यातील पोलिस पथकासमवेत माग काढून छापा टाकला. या वेळी बोगस चारही डॉक्टरांना ताब्यात घेतले. वैद्यकीय समिती पथक डॉ. मनोज ठाकरे.

Material seized by the police from fake doctors including medicinal pills.
Nashik Fake Doctor : वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना रुग्णांवर उपचार; बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

डॉ. हितेंद्र गायकवाड, डॉ. महेंद्र शिंपी, डॉ. साहेबराव बोरसे यांच्या वैद्यकीय समिती पथकास बोगस डॉक्टर पिंपळनेर पोलिस ठाणे परिसरात वेगवेगळ्या कंपनीच्या औषध-गोळ्यांनी उपचार करीत असल्याचे आढळले. या प्रकरणी पिंपळनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, पोसई भाईदास मालचे.

असई बापू पिंपळे, हवालदार श्यामराव अहिरे, पोलिस नाईक विश्वेस हजारे, भास्कर सूर्यवंशी, सोमनाथ पाटील, रवींद्र सूर्यवंशी, संदीप मोहिते, हरीश पाटील यांचा कारवाईत सहभाग होता.

Material seized by the police from fake doctors including medicinal pills.
Dhule Crime News : सोयाबीनच्या 80 गोण्या लंपास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.