चिमठाणे : वाडी (ता. शिंदखेडा) येथील ४५ वर्षीय तरुण शेतकऱ्याने बुधवारी (ता. ११) दुपारी तीनच्या सुमारास शेतीसाठी राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या घेतलेल्या कर्जाच्या विवेचनातून गावशिवरातील विहिरीत उडी घेत जीवनयात्रा संपविली. याबाबत रात्री आठला शिंदखेडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू्ची नोंद करण्यात आली.
वाडी येथील शेतकरी लोटनसिंह इंद्रसिंह गिरासे यांची गावशिवरात तीन एकर शेतजमीन असून, त्यांनी मालपूर (ता. शिंदखेडा) येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेतून पीककर्ज व शेतीपयोगी कर्ज घेतले होते. (Farmer death by jumping in well reason of bank loan tension Jalgaon Crime News)
नैसर्गिक संकटामुळे कर्ज फेडता येत नसल्याच्या विवंचनेतून बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास गावशिवरातील मोहनसिंह निंबा गिरासे यांच्या विहिरीत उडी मारल्याचा फोन आल्याने गावातील ललित गिरासे, रवींद्र गिरासे, मानसिंह गिरासे आदींनी त्यांना विहिरीतून बाहेर काढले.
खासगी वाहनाने शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत गवांदे यांनी सायंकाळी साडेसहाला मृत घोषित केले.
याबाबत चुलत पुतणे मोहनसिंह प्रतापसिंह गिरासे (वय ४६) यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात खबर दिल्यावरून आकस्मिक मृत्यू्ची नोंद करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली चिमठाणे पोलिस दूरक्षेत्राचे नाईक प्रशांत पवार तपास करीत आहेत. त्यांना पत्नी व दोन मुले असून, गुरुवारी (ता. १२) अकराच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.