Dhule Crime: शेतीच्या वादातून मारहाणीत जैतपूरला शेतकऱ्याचा मृत्यू; थाळनेर पोलिसांकडून संशयित अटकेत

Vijaysingh Rajput
Vijaysingh Rajputesakal
Updated on

Dhule Crime : शेतीच्या हिस्सेवाटणीच्या वादातून सख्ख्या भावासह पुतण्यांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचे उपचार घेताना निधन झाले.

ही घटना १५ सप्टेंबरला जैतपूर (ता. शिरपूर) येथे घडली. थाळनेर पोलिसांनी संशयितांना अटक केली. (Farmer dies in Jaitpur due to agricultural dispute Suspect arrested by Thalner police Dhule Crime)

जैतपूर शिवारात मोंडूसिंह अंबरसिंह राजपूत यांची शेती आहे. त्यांच्या शेताची हिस्सेवाटणी झालेली नाही. त्यांच्या सहा मुलांपैकी विजयसिंह राजपूत (रा. जैतपूर) यांच्या वाट्याला केवळ दोन एकर शेती आली.

त्यामुळे त्यांनी अतिरिक्त शेती मिळावी, अशी मागणी भावांकडे केली होती. त्यावरून त्यांच्यात वाद सुरू होते. १४ सप्टेंबरला ते शेतात बैल घेण्यासाठी गेले असता ‘तुम्हाला ट्रॅक्टर, म्हशी यापैकी काहीच देणार नाही, शेतात पाय ठेवू नका’ अशी धमकी संशयितांनी दिली होती.

१५ सप्टेंबरला विजयसिंह राजपूत बैलांना चारापाणी देण्यासाठी दुपारी शेतात गेले. ते सायंकाळी उशिरापर्यंत न परतल्याने त्यांचा शोध सुरू झाला. सायंकाळी साडेसातला शेतात ट्रॅक्टरजवळ ते जखमी व बेशुद्धावस्थेत आढळले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Vijaysingh Rajput
Nashik Crime: भेसळयुक्त मिठाईविक्रीत वाढ! घरातच तयार केलेली मिठाई सेवन करा, अन्न-औषध प्रशासन व डॉक्टरांचा सल्ला

त्यांना धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना १६ सप्टेंबरला रात्री बाराला त्यांचे निधन झाले.

विजयसिंह राजपूत यांचा मुलगा प्रशांत राजपूत याने थाळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शेतीच्या हिस्सेवाटणीच्या वादातून संशयित काका देवनाथसिंह राजपूत, चुलतभाऊ अमोल रजेसिंह राजपूत व प्रदीप रजेसिंह राजपूत (सर्व रा. जैतपूर) यांनी विजयसिंह राजपूत यांच्या डोक्यात दगड घातला.

त्यांचे डोके ट्रॅक्टरला जोडलेल्या डोझरवर आपटून गंभीर जखमी केले. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे. संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना तातडीने अटक करण्यात आली. सहाय्यक निरीक्षक दीपक पावरा तपास करीत आहेत.

Vijaysingh Rajput
Kolhapur Crime : सापावर पाय पडल्याच्या भीतीनं इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू; तापानं फणफणतं होतं अंग, CPR मध्ये नेलं पण..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.