Dhule News: अवकाळीच्या धसक्याने शेतकऱ्याने संपवले जीवन

Death
Deathesakal
Updated on

पिंपळनेर : चिकसे (ता. साक्री) येथील शेतकरी हिंमत झिप्रा खैरनार (वय ४२) यांनी शेतातील घराजवळील आंब्याच्या झाडाला स्वतःला फास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. २७) पहाटे चारच्या सुमारास उघडकीस आली. (Farmer ends his life due to heavy rain unseasonal crop damage Dhule News)

शेतात कच्च्या भिंती व पत्रा असलेल्या घरात राहणारे खैरनार अवकाळी पाऊस सुरू झाल्यानंतर मनाची चलबिचल होऊ लागल्याने घरात आणि बाहेर अस्वस्थपणे येरझारा घालू लागले होते. दुपारी तीनच्या सुमारास सुरू झालेला पाऊस रात्रीही बंद होण्याची चिन्हे नव्हती.

पत्नीशी बोलताना हिंमत हे ‘हा पाऊस आपले आणखी नुकसान करणार’ असे म्हणत होते. रात्री उशिरा पत्नी व मुले झोपी गेल्यानंतरही ते बरसणारा पाऊसच पाहत बाहेर बसले होते.

रात्री दोन ते अडीचच्या सुमारास पत्नी सरलाबाई यांना पती घरात दिसले नाही म्हणून त्या घराबाहेर गेल्या असता ते जवळया आंब्याच्या झाडाला फास लावून लटकलेले दिसले. त्यांनी कुटुंबीयांना आरडाओरड करून झोपेतून जागे करत शेजाऱ्यांना फोन करून घटनेची माहिती दिली.

Death
Dhule Crime News: तरूणाला मुलींसमोर रिल बनविणे पडले महागात! बसस्थानकात पोलिसांनी घडवली अद्दल

हिंमत खैरनार अल्पभूधारक शेतकरी होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कुटुंबातील सर्व मोलमजुरी करतात. आईच्या आजारपण, मोठी मुलगी लग्नाची आहे. तसेच त्यांच्यावर हात उसनवारीचे दोन ते अडीच लाख रुपये कर्ज होते.

उन्हाळ कांदा अवकाळी पावसात खराब झाला होता. गेल्या वर्षी अवकाळीने फटका खाल्लेला असल्यामुळे पुन्हा अवकाळी पावसाला सुरवात झाली.

कांद्याला पुन्हा फटका बसणार या नैराश्याने त्यांना ग्रासले व त्यातूनच त्यांनी जीवनयात्रा संपवली. पत्नी, दोन मुली व मुलासह मोलमजुरी करून हात उसने घेतलेले कर्ज परतफेडीसाठी हातभार लावत होते, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

Death
Crime: व्हिडीओ गेममुळे अल्पवयीन मुलाचा खून ? चौथीच्या मुलांनी केले होते १०० वार, CCTV फुटेज देण्यात शाळेची दिरंगाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.