Dhule News : सततची नापिकी, अवकाळी पाऊस, शेतीच्या माला योग्य भाव नसल्याने बॅंकेचे कर्ज कसे फेडले जाईल, या विवंचनेतून येथील शेतकऱ्याने आज (ता.६) सकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास घराच्या छताला दोराने गळफास घेऊन जिवन यात्रा संपविली.
त्र्यंबक राजधर पाटील (वय ४०) असे शेतकऱ्याचे नाव असून चिमठाणे गावशिवरातील गट क्रमांक ८६३ या क्षेत्रावर बँकेचा बोझा होता. (Farmer suicide due to indebtedness 3 youths died in 10 days Dhule News)
अवकाळी पाऊस, नापिकी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसल्याने आज सकाळी पावणेसहाच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी सिलिंगला दोर बांधून गळफास घेत आत्महत्या केली.
त्याला खासगी रुग्णवाहिकेने शिंदखेडा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन वाघ यांनी मृत घोषित केले. आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत चुलत भाऊ पंडित नथ्था पाटील याने शिंदखेडा पोलिस ठाण्यात माहिती दिली. आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात आई ,वडील, दोन भाऊ ,पत्नी व एक मुलगा आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
दहा दिवसात तीन तरुणांचा मृत्यू
चिमठाणे येथील अभियंता प्रथमेश भीमराव धनगर या अविवाहित एकुलता एक तरुणांचा २८ मे रोजी अपघाती मृत्यू झाला.
येथील रहिवासी व बाळदे (ता.शिरपूर) विद्यूत वितरण कंपनीच्या ३३/११ उपकेंद्र ऑपरेटर असलेला प्रवीण विजय गवते याने रविवारी (ता.४) सुकवद येथील सुलवाडे बॅरेजमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली.
आज येथील शेतकरी त्र्यंबक राजधर पाटील याने कर्जबाजारीपणामुळे फाशी घेऊन आत्महत्या केली. दहा दिवसात तीन तरुणांचा मृत्यू झाल्याने गावावर जणू मोठे संकट आले की असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.