संग्रामपूर(बुलढाणा) : ट्रिगरमध्ये पात्र असूनही सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संत्राबागा विम्याच्या प्रतीक्षेत अडून पिक विमा कंपनीकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची एकप्रकारे थट्टा च सुरू आहे. पिकांना हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण म्हणजे शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदतिचे . याकरता फळ पिक विमा योजना सुरू करण्यात आली आहे.
फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना राबवली जात आहे. मात्र, संग्रामपूर तालुक्यात सोनाळा, बावनबीर महसुल मंडळ संत्रा मृग बहार २०२३ - २४ फळपिक मृग नक्षत्राचे पहिले एक दोन पाऊस जोराचे ४० ते ५० मि. मी. असावेत तसेच या कालावधीत ढगाळ वातावरण विमा योजनेच्या ट्रिगरमधे पात्र असुनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
मृगबहार येण्याकरिता जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा दुसरा आठवडा या कालावधीत संत्रा बागेतील जमिनीमध्ये भरपूर ओलावा असणे आवश्यक आहे. या कालावधीत किमान २०० ते २५० मि.मी. पाऊस पडलेला असावा. जर या कालावधीत पाऊस १५० मि.मी. पेक्षा कमी पडल्यास बहार येण्यामध्ये अडचणी निर्माण होतात.
शेतकऱ्यांनी जमीनीची पोत पाहुन आपापल्या संत्रा बागा तळणावर सोडल्या होत्या. मात्र, जूनमध्ये अपुरा पाऊस पडल्याने जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला नाही . विमा ट्रिगर नुसार १२४ मीमी पेक्षा जास्त पावसाची नोंद असणे गरजेचे असते. मात्र, याच कालावधीत सोनाळा महसूल मंडळात १०१.९ मीमी तर बावनबीर महसुल मंडळात १०३ मिमी पावसाची नोंद झाल्याने सोनाळा बावनबीर महसूल मंडळ संत्रा मृग बहार २०२ ३ करीता पिकविमा मिळण्यास पात्र आहे. त्यामुळे तात्काळ शेतकत्याच्या खात्यात विम्याची रक्कम जमा करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.