Nandurbar Agriculture News : बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक

Pandit Mali, Arjun Marathe and other officials while giving information in the press conference.
Pandit Mali, Arjun Marathe and other officials while giving information in the press conference.esakal
Updated on

Nandurbar Agriculture News : नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट (बोगस) बियाणे विक्री होत असून, त्यातून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. कृषी विभाग मात्र हातावर हात ठेवून बसला आहे.

बोगस बियाणे विक्रेत्यांची चौकशी करून कारवाई न झाल्यास शिवसेना (उबाठा) आंदोलन छेडेल, असा इशारा नंदुरबार महानगरप्रमुख पंडित माळी यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना दिला.(Farmers cheated by fake seeds nandurbar news)

श्री. माळी यांनी शेतकऱ्यांवर येणाऱ्या संकटाविषयी माहिती देण्यासाठी बुधवारी (ता. १८) पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, की शेतकऱ्यांवर अस्मानी व सुलतानी संकटे येत आहेत.

शेतकरी कसाबसा सावरत आहे. त्यातच लगतच्या गुजरातमधील बोगस बियाण्याने शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. जास्त उत्पादन अन् बियाण्याचे कमी भाव या लालसेने शेतकऱ्यांना फसविले जात आहे.

Pandit Mali, Arjun Marathe and other officials while giving information in the press conference.
Nandurbar Agriculture News : सोयाबीन पिकावर मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव; कापूस पिकालाही फटका

माझ्या स्वतःच्या शेतात तणनाशक बोगस देऊन फसवणूक केली. कृषी विभागाने त्याचा पंचनामाही केला. मात्र पुढे त्याचे काहीही झालेले नाही. कृषी विभागाने शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्यासाठी योग्य पाऊल उचलावे.

तसेच नंदुरबार जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. युवा सेना जिल्हाधिकारी अर्जुन मराठे व पदाधिकारी उपस्थित होते.

Pandit Mali, Arjun Marathe and other officials while giving information in the press conference.
Nandurbar Agriculture News: पांढऱ्या सोन्याच्या वेचणीस प्रारंभ; कापसाला चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.