Dhule News : अस्मानीसह सुलतानी संकटाने शेतकरी त्रस्त; शेतशिवारात भारनियमन वाढले

Yuvraj Patil's well is closed due to lightning even though it has enough water.
Yuvraj Patil's well is closed due to lightning even though it has enough water.esakal
Updated on

Dhule News : गेल्या एक महिन्यापासून पाऊस नाही पिके जळू लागली आहेत. विहिरी आणि कूपनलिकांमध्ये जेमतेम पाणी आहे या पाण्यावर पिके जगविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत. मात्र गेल्या आठ दिवसांपासून वीज वितरण कंपनीने अचानक लोडशेडिंग सुरू केले आहे.

वीज केव्हाही येते आणि केव्हाही जाते. याचा परिणाम बागायतदार शेतकऱ्यांच्या पिकांवर झाला आहे. आधीच पाऊस नाही, त्यात विजेच्या लपंडावाचा खेळ सुरू झाला आहे.

(Farmers have suffered due to rain and electricity crisis dhule news)

अस्मानी संकटासह सुलतानी संकटामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. नियमित वीजपुरवठ्याची मागणी होत आहे.

धुळे जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे मोठी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या महिनाभरापासून पाऊस नाही. पिके करपत चालली आहेत. विहीर आणि कूपनलिका आटत चालल्या आहेत. जलपातळी घटत चालली आहे. बागायती पिके ही जगविण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

दिवसापेक्षा रात्री अधिक वीज दिली जात होती. आता विजेचाही लपंडाव सुरू झाला आहे. पिके कशी जगवावीत हा शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. किमान विहिरी आणि कूपनलिकेच्या पाण्यावर १५-२० टक्के हंगाम तरी येईल, अशी आशा बागायतदार शेतकऱ्यांना होती. ती आशाही आता फोल ठरत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Yuvraj Patil's well is closed due to lightning even though it has enough water.
Dhule Rain Crisis: न्यहळोद येथील शेतकऱ्यांनी कपाशी पिकात सोडल्या मेंढ्या! पावसाअभावी पिके धोक्यात

दरम्यान, वीज वितरण कंपनीने रात्री का असेना पण पूर्णवेळ वीजपुरवठा करावा, अशी मागणी उद्योजक अरुण पाटील, शेतकरी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजा पाटील, शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष आत्माराम पाटील, जिल्हा उपाध्यक्ष नारायण माळी, तालुकाध्यक्ष भगवान पाटील, जिल्हाध्यक्ष गुलाबसिंग रघुवंशी, युवराज पाटील, भागवत पाटील आदींनी केली आहे.

"परिसरात पाऊस नाही. पिके करपत आहेत. शेतकरी रात्रीचा दिवस करून विहिरी वा कूपनलिकेच्या पाण्याने पिके जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. विजेचा लपंडाव सुरू झाल्याने पाणी भरण्यास मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. पावसाने मारले आता वीज कंपनी शेतकऱ्यांना बरबाद करण्यामागे लागली आहे. -युवराज पाटील, अल्पभूधारक शेतकरी

"वीज कंपनीने अधिकचे लोडशेडिंग सुरू केले आहे. बागायती पिके जगविणे कठीण झाले आहे. कमी पाण्यात पिके जगविण्यासाठी तारेवरची कसरत होत आहे." -राजा पाटील, अध्यक्ष, शेतकरी विविध कार्यकारी सेवा संस्था, कापडणे

Yuvraj Patil's well is closed due to lightning even though it has enough water.
Dhule INDIA Group News : भाजपविरोधात एकदिलाने लढू; धुळे इंडिया आघाडीचा निर्धार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.