Onion Subsidy News : पावणेसात कोटींच्या अनुदानापासून वंचित; 5 महिन्यांनंतरही बँकेच्या खात्यात रुपयाही जमा नाही

Onion News
Onion Newsesakal
Updated on

Onion Subsidy News : जिल्ह्यात ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत लेट खरीप हंगामात कांदा विक्री केला त्या शेतकऱ्यांना ३५० रुपये प्रतिक्विंटल या दराने २०० क्विंटलच्या मर्यादेत अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.

या निर्णयाला पाच महिने झाले तरी अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एक छदामही जमा झालेला नाही. जिल्ह्यातील पात्र कांदा उत्पादक शेतकरी सुमारे पावणेसात कोटींच्या अनुदानापासून वंचित आहेत.

चालू वर्षातील फेब्रुवारी २०२३ च्या सुरवातीस कांद्याच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले. (farmers not get onion subsidy till now dhule news)

नंतर राज्य शासनाकडून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी बाजार समिती, पणन अनुज्ञप्तीधारकांकडे अथवा नाफेडकडे ज्या शेतकऱ्यांनी कांदा विक्री केलेला असेल, त्यांना अनुदान देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटनांनी केली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान देण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय २७ मार्चला झाला. मात्र, काही कारणास्तव ही प्रक्रिया रखडली.

पावणेसात कोटी अपेक्षित

ही बाब नंतर बहुतांश शेतकरी व इतर विभागातील कर्मचाऱ्यांकडून शासनाच्या निदर्शनास आणल्यावर आता २१ ऑगस्टला दोन टप्प्यांत हे अनुदान वितरित करण्याबाबत निर्णय झाला. शासनाला जिल्ह्यातून कांदा अनुदान मागणीसाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार पात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ५३.९४ टक्क्यांनुसार निधीचा पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात येणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Onion News
Dhule Onion News : कांदा अनुदानासाठी धुळ्यात समितीची स्थापना

शंभर टक्के अनुदानाची मागणी असलेल्या जिल्ह्यात धुळ्याचाही समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र कांदा उत्पादकांना सुमारे सहा कोटी ८१ लाख ११ हजार २६५ इतकी रक्कम मिळणे अपेक्षित आहे.

समितीवर जबाबदारी

या पार्श्वभूमीवर तालुकास्तरावर प्राप्त झालेल्या तक्रारीचे निवारण न झाल्यास जिल्हास्तरावर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीत तक्रारींचे निवारण करण्यात येईल. जिल्हास्तरीय समितीने दिलेला निर्णय अंतिम राहील. काही तक्रारी, अडचणी असल्यास अनुदानाबाबत धुळे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी संबंधित उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आहे.

Onion News
Nashik Onion Rate : पाककडून कांदा निर्यातमूल्य 220 डॉलर; नाशिकमध्ये कांद्याच्या दरात 'इतक्या' रुपयांची वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()