Dhule Agriculture News : भाजीपाला,फळ शेतीतून काळगावच्या शेतकऱ्यांची भरारी

फळपीक आणि भाजीपाला शेतीतून काळगाव (ता.साक्री) येथील शेतकऱ्यांनी स्वतःची प्रगती साधली
People appointed Sarpanch Sanjay Bhamre and villagers during mass puja in Gram Panchayat as six farmers bought tractors for farming at one time in the village.
People appointed Sarpanch Sanjay Bhamre and villagers during mass puja in Gram Panchayat as six farmers bought tractors for farming at one time in the village.esakal
Updated on

Dhule Agriculture News : फळपीक आणि भाजीपाला शेतीतून काळगाव (ता.साक्री) येथील शेतकऱ्यांनी स्वतःची प्रगती साधली आहे. अपेक्षित उत्पन्न घेत बदल घडवत आधुनिक शेतीची कास धरली आहे.

यांत्रिक शेतीसाठी स्वयंचलित वाहनांचा वापर वाढला असून एकाच वेळी गावातील सहा शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदी करत इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा दिली. ग्रामपंचायतीतर्फे नव्या ट्रॅक्टरची सामुहिक पूजन करत शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. (Farmers of Kalgaon have achieved their own progress through fruit and vegetable farming dhule news)

काळगाव सारख्या लहान गावाने शेतीतूनच मोठा बदल केल्याचे समाधानकारक चित्र आहे. शेती परवडत नाही ही फक्त रडकथा असल्याचे सिद्ध करत जिद्द, चिकाटी, मेहनत, नियोजनपूर्वक वेगळी शेती केल्यास मातीत सोने पिकवण्याचे धाडस शेतकरी करत असल्याचे चित्र आहे.

काळगावची लोकसंख्या एक हजार ०९३ असून ४१० हेक्टर महसूल क्षेत्र (शेतजमीन) आहे. एक हजार ३२० हेक्टर वनक्षेत्र आहे. सुमारे दोनशे बारा शेतकरी कुटुंबे असून बऱ्यापैकी जलसाठा असल्याने नव्वद टक्के बागायती शेती आहे.

फळ, भाजीपाला शेती करण्यात शेतकऱ्यांचा हातखंडा आहे. आदिवासी समाज बांधवाकडेही शेती असल्याने तेही फळशेती करत असल्याचा वेगळा आदर्श आहेच. गावातील ज्येष्ठ आदिवासी शेतकरी धनसिंग राघो सोनवणे यांच्याकडे शंभरपेक्षा अधिक खिल्लार गाई आहेत.

अवघ्या दोन गाईंपासूनच्या उत्पादनातून गावच काय तालुक्यात सर्वाधिक खिल्लार गाई श्री. सोनवणे यांच्याकडे असल्याचे सांगितले जाते. केवळ शेती व्यवसायातून प्रत्येक घरात बदल झाल्याचे हे उदाहरण आहे.

People appointed Sarpanch Sanjay Bhamre and villagers during mass puja in Gram Panchayat as six farmers bought tractors for farming at one time in the village.
Agriculture: ‘स्वाक्षरी’ नसल्याच्या कारणाने विमाभरपाई रेंगाळली ! विमा कंपनी आग्रही; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष

यांत्रिकीकरणाकडे सर्वाधिक कल

पारंपरिक शेतीत बदल करत आधुनिक शेतीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल आहे. आंतरमशागत, पेरणीसह फवारणीसाठीही ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. गावात एकाच दिवशी सहा शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदी केले.

ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच संजय निंबाजी भामरे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सामुहिक पूजन करण्यात आले. शेती उत्पादनातून शेतकऱ्यांमध्ये मोठा बदल झाल्याचे सांगत सरपंच संजय भामरे यांनी तरुण शेतकऱ्यांचे कौतुकही केले.

सहा वर्षांपूर्वी 'सकाळ' च्या लोकसहभागात नालाबांध व शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाचा यशस्वी प्रयोगामुळे काळगावात दुष्काळात जलस्रोत टिकून आहे. ठिबक सिंचनाद्वारे जवळपास सर्वच शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. डाळिंब, शेवगा, सीताफळ शेतीत चांगले उत्पन्न घेत शेतकऱ्यांनी मोठा बदल केला आहे.

People appointed Sarpanch Sanjay Bhamre and villagers during mass puja in Gram Panchayat as six farmers bought tractors for farming at one time in the village.
Jalgaon Agriculture News : ‘सोन्याचं घुंगरू गोफणीला, यंदाच ज्वारीचं पीक आलंय बघा राखणीला..

गावात प्रत्येकाच्या दारी वाहन

गावात ग्रामस्थाकडे शंभरहून अधिक दुचाकी, नामांकित कंपन्यांच्या चारचाकी, शेतीमाल वाहतुकीसाठी पिकअप वाहने, लहान श्रेणीचे वीस तर मोठे बेचाळीस असे एकूण ६२ ट्रॅक्टर तर विदेशी तंत्रज्ञानाची आठ फवारणी ब्लोअर शेतकऱ्यांकडे शेतीसाठी उपलब्ध आहेत.

मेहनतीतून शेतकऱ्यांनी स्वतःचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले आहेत.शेतीत नवनवीन प्रयोग करत उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान वापरत आहेत.आज शेतकरी शेतीच्या माध्यमातून विकास साधत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. - संजय भामरे, काळगाव (ता. साक्री).

People appointed Sarpanch Sanjay Bhamre and villagers during mass puja in Gram Panchayat as six farmers bought tractors for farming at one time in the village.
Nandurbar Agriculture News : भोरटेक शिवारात 7 एकर ऊस खाक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.