Nandurbar Agriculture News : शहादा तालुक्यात शेतकऱ्यांची ऊस लागवडीला पसंती; मजूरटंचाईचा परिणाम

Farm laborers while planting sugarcane in Shiwar.
Farm laborers while planting sugarcane in Shiwar.esakal
Updated on

Nandurbar Agriculture News : तालुक्यात पाण्याची उपलब्धता पाहता बहुतांश बागायतदार शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी व सुरू हंगामातील उसाची लागवड सुरू केली आहे.

बदलते निसर्गचक्र तसेच उत्पादित मालाला खर्चाच्या तुलनेने मिळणारे कवडीमोल, मजूरटंचाई या समस्या पाहता बहुतांश शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला पसंती दिली आहे.(Farmers prefer sugarcane cultivation in Shahada taluka nandurbar agriculture news)

तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कूपनलिकांच्या सहाय्याने बागायती शेती केली जाते. त्याचबरोबर केळी, पपई, ऊस, कापूस आदी पिकांसह विविध कडधान्यांचे उत्पादन घेतले जाते; परंतु गेल्या काही वर्षांपासून मजुरांची सातत्याने होणारी टंचाई तसेच मजुरीचे दर वाढल्याने उत्पादित मालाला लागणारा खर्चही वाढला आहे; परंतु त्या मानाने अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शेती परवडेनाशी झाली आहे.

परिणामी उसाला काहीअंशी मजुरी कमी लागते, तसेच कीटकनाशकांची फवारणीही नसल्याने अधिकाधिक शेतकरी ऊस लागवडीस पसंती देत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पाणी आहे ते शेतकरी ऊस लागवडीकडे वळत आहेत. परिसरात दुर्गा खांडसरी, पुरुषोत्तमनगर येथील नागाई शुगर तसेच समशेरपूर येथील आयान मल्टी ट्रेड एलएलपी आदी कारखान्यांमध्ये परिसरातील ऊस गाळपासाठी जातो.

पैकी यंदा पुरुषोत्तमनगर येथील नागाई शुगरचा गळीप हंगाम सध्या तरी बंद आहे. गेल्या वर्षी ऊस उत्पादकांचे देणे थकल्याने सद्यःस्थितीत कारखाना बंद आहे. उर्वरित दोन्ही कारखान्यांमध्ये परिसरातील ऊस गाळपासाठी जात आहे. सुधारित जातीचे ऊस बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहे. पट्टा पद्धतीने लागवड करणे व कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान वापरत आहे.

उसालाही दर कमीच

राज्यातील इतर कारखान्यांच्या तुलनेत जिल्ह्यातील कारखान्यांकडून शेतकऱ्यांना पाहिजे तसा दर मिळत नसल्याने ऊसदराविषयी शेतकऱ्यांची नाराजी कायम आहे. परंतु इतर पिकांना लागणारा खर्च, त्यासोबतच करावी लागणारी मेहनत पाहता त्यामानाने ऊस नैसर्गिक संकटातही तग धरून राहतो म्हणून बहुतांश शेतकरी ऊस लागवडीस पसंती देत आहेत.

''जिल्ह्यातील कारखानदारांकडून उसाला कमी दर दिला जात असला, तरी मजूरटंचाई, बदलते निसर्गचक्र पाहता उसाचा उत्पादनातून हाताला दोन पैसे कमी मिळतील; परंतु हमीचे उत्पादन मिळते म्हणून ऊस लागवडीला पसंती देत आहोत.''-राकेश पाटील, ऊस उत्पादक शेतकरी, बामखेडा

Farm laborers while planting sugarcane in Shiwar.
Nandurbar Agriculture News : तळोदा परिसरात सोयाबीन काढणीस सुरवात; उत्पादनात मोठी घट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.