उच्च डिग्री तरीही 'नो' नोकरी..पितापुत्राचे शेतात विक्रमी उत्पादन !

चार महिने निघणारी भेंडी ही पावसाळ्यात चांगला भाव देवून जाईल
उच्च डिग्री तरीही 'नो' नोकरी..पितापुत्राचे शेतात विक्रमी उत्पादन !
Updated on



कापडणे : येथील भाजीपाला उत्पादक (Vegetable production) शेतकरी (farmer) राघो माळी आणि मनोहर माळी या पितापुत्रांनी एकरभर शेत्रात भाजीपाल्याचे विक्रमी उत्पादन (Record production) काढत आहेत. विशेष म्हणजे मनोहर माळी हे एमस्सी बी.एड. आहेत. नोकरी नसल्याने पाच वर्षांपासून शेतीत राबीत उत्तम शेती आणि कनिष्ठ नोकरी हे सिध्द करण्याची धडपड यशस्वी ठरवित आहेत. भाजीपाल्याला चांगले भाव राहिल्यास नोकरीची (job) चाकरी करण्याची आवश्यकता नाही शिक्षणाचा (Education) उपयोग शेतीत केल्यास शेतीसह आपलेही भाग्य उजळते.

(farmer father and son vegetable record production)

उच्च डिग्री तरीही 'नो' नोकरी..पितापुत्राचे शेतात विक्रमी उत्पादन !
साक्री तालुक्यात कोरोनामुळे ३१ शिक्षकांचा मृत्यू

भेंडी, पालक व मुळामुळे आर्थिक पाठबळ
राघो माळी व मनोहर माळी हे अल्पभूधारक शेतकरी पितापुत्र आहेत. सव्वा एकर शेत जमिनीतून भाजीपाल्याचे उत्तम उत्पादन ते काढतात. ते भेंडी, पालक व मुळाचे उत्पादन विक्रमी काढतात. वर्षभर विहिरीला पाणी टिकल्यास एकरभर जमिनीतूनही लाखमोलाचे उत्पादन होते. चौकोनी कुटूंबाचा गाडा सहज हाकता येतो, असे माळी यांनी सांगितले. माळी यांच्या शेतातून सध्या भेंडी निघू लागली आहे. स्थानिक भाजारात प्रती किलो वीसने विक्री होत आहे. तरीही परवडत असल्याचे सांगतिले. चार महिने निघणारी भेंडी ही पावसाळ्यात चांगला भाव देवून जाईल, असे अपेक्षा आहे.

उच्च डिग्री तरीही 'नो' नोकरी..पितापुत्राचे शेतात विक्रमी उत्पादन !
म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण जळगाव जिल्ह्यात

उच्च डिग्री तरीही नो नोकरी
माळी यांचा मोठा मुलगा सुरत येथे रोजगारा निमित्ताने स्थिर झाला आहे. तर लहान मुलगा मनोहरने मोठे कष्ट घेत शिक्षण पुर्ण केले. एमस्सी बीएड असूनही सात वर्षांपासून नोकरी नाही. शेवटी वडीलांपासून शेतीचे धडे गिरवित भाजीपाला उत्पादन काढण्यात माहिर झाला आहे. शेती बरोबरच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत यशस्वी होण्याचा दुर्दम्य आशावाद माळी यांनी व्यक्त केला. दरम्यान उन्हाळा असूनही भाजीपाला मुबलक निघत आहे. लाॅक डाऊन असल्याने दर प्रती किलो तीसच्या खालीच असल्याने शेतकर्‍यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.