Dhule News : महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे वाहनधारकांमध्ये भीती

Accident News
Accident Newsesakal
Updated on

सोनगीर (जि. धुळे) : मुंबई-आग्रा महामार्गावर वाघाडी फाट्यावरील गतिरोधकावर नुकतेच बेटावद येथील प्रकाश रोकडे यांची पत्नी मोटारसायकलवरून पडून जबर जखमी झाली. (Fear among motorists due to increasing accidents on highways in songir dhule news)

दररोज अपघात होत होत असताना राष्ट्रीय महामार्ग व टोलप्लाझा प्रशासनाला काही सोयरसुतक नाही. त्यामुळे अजून किती बळी जाऊ द्यायचा म्हणजे उपाययोजना होईल, असा प्रश्न नागरिकांना उपस्थित केला आहे.

अपघात कमी करण्यासाठी काय करावे हेच महामार्ग प्रशासनाला सुचत नसल्याने ते कधी नियमबाह्य पद्धतीने गतिरोधक बसवितात, तर कधी काढतात. लाखमोलाचा जीव कवडीमोल पद्धतीने बळी जाताना पाहून नॅशनल हायवे ॲथॉरिटी काय करते, असा प्रश्न निर्माण होतो. आवश्यक ठिकाणी उड्डाणपूल व सर्व्हिस रोड न बनविल्याने ही परिस्थिती ओढवली असून, अपघातातील मृत्यू प्रकरणी महामार्ग बनविणारी सद्‍भाव कंपनी, टोलप्लाझा प्रशासन व महामार्ग प्रशासनावर सदोषवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, या संदर्भात उपाययोजना कधी करणार, अशी विचारणा टोलप्लाझा प्रशासनाकडे केली असता त्यांनी महामार्ग प्रशासनाकडे बोट दाखविले. महामार्ग प्रशासनाचे अधिकारी अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व्हिस रोडसाठी निधी मिळत नसल्याचे सांगितले. त्यामुळे सोनगीर व परिसरातील जनतेला अजून काही वर्षे महामार्गावर जीव मुठीत घेऊन जावे लागेल हे स्पष्ट आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Accident News
Nashik Beer Production : नाशिकला बिअरनिर्मितीचा श्रीगणेशा! उद्योग, पर्यटनाला मिळणार ऊर्जितावस्था

येथील वाघाडी फाटा अपघातप्रवण क्षेत्र झाले असून, तेथे उड्डाणपूल व सर्व्हिस रोड न देता महामार्गावर वाघाडीकडे जाण्यासाठी क्रॉसिंग दिले. मात्र सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना नाहीत. विशेष म्हणजे शिरपूरकडून येणाऱ्या वाहनांना येथे उतार असल्याने भरधाव वाहने येतात. त्याच वेळी वाघाडीकडून येणारी वाहने क्रॉस करत असताना अपघाताचा धोका वाढतो.

अनेकदा ग्रामस्थांनी आंदोलने केली. मात्र आश्वासन देऊन वेळ मारून नेण्याचा प्रकार टोलप्लाझा प्रशासनाने केला. ग्रामस्थांच्या जिवाशी चालणारा हा खेळ कधी थांबेल, हा प्रश्नच आहे.

गतिरोधकांमुळे अपघात

टोलप्लाझा कंपनीने उड्डाणपूल न देता अपघात कमी करण्यासाठी महामार्गावर गाव नसताना अक्षरशः अवैधरीत्या गतिरोधक टाकले. गतिरोधक लक्षात येत नसल्याने अपघातांचे प्रमाण उलट वाढले. गतिरोधक टाकायचेच होते तर चौपदरीकरणाचा काय फायदा? टोलवसुली कशाची? महामार्गालगत गावांना सर्व्हिस रोड, पथदीप व उड्डाणपूल आदी सुविधा पुरविल्या पाहिजे होत्या.

मात्र टोल कंपनीने ग्रामपंचायत व ग्रामस्थांना अंधारात ठेवून एकही सुविधा पुरविली नाही. महामार्गावर अनेक ठिकाणी उड्डाणपुलाची किमान भुयारी मार्गाची तसेच गावालगत दोन्ही बाजूंनी सर्व्हिंस रोडवर नऊ वर्षांत एक हजाराहून अधिकांनी प्राण गमावले आणि त्यापेक्षा अधिकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले. रुग्णवाहिका वगळता कोणत्याही उपाययोजना टोलप्लाझा प्रशासनाने केलेल्या नाहीत.

Accident News
Market Committee Election : निवडणूक रणसंग्राम; तिसऱ्या दिवशी 102 अर्जांची विक्री; 11 अर्ज दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.