Dhule Marathon 2024 : कुस्तीगीर, धावपटूसह सिनेतारका धुळ्यात; पोलिस मैदानावर 4 फेब्रुवारीला ‘धावोत्सव’

४ फेब्रुवारीला पहाटे पाचपासून पोलिस कवायत मैदानावर होणाऱ्या मॅरेथॉनची सर्वांना हुरहुर लागून असून, नामांकित कुस्तीपटू, धावपटू, सिनेतारका या वेळी आकर्षण असतील.
Sangram Singh, Vijay Chaudhary, Kavita Raut, Sanskriti Balgude
Sangram Singh, Vijay Chaudhary, Kavita Raut, Sanskriti Balgudeesakal
Updated on

Dhule Marathon 2024 : जिल्ह्याची नवी ओळख ठरलेल्या आणि क्रीडापटूंसह हौशी धुळेकरांच्या मनामनात ठसलेली धुळे मॅरेथॉन स्पर्धा २०२४ (सीझन- २) अवघ्या दहा दिवसांवर येऊ ठेपली आहे. गेल्या वर्षी निरामय आरोग्योत्सव आणि पंचवीस हजारांहून अधिक स्पर्धकांच्या सहभागातून धावोत्सवाची अनुभूती धुळेकरांनी घेतली.

यापाठोपाठ यंदा ४ फेब्रुवारीला पहाटे पाचपासून पोलिस कवायत मैदानावर होणाऱ्या मॅरेथॉनची सर्वांना हुरहुर लागून असून, नामांकित कुस्तीपटू, धावपटू, सिनेतारका या वेळी आकर्षण असतील. (February 4th is marathon famous wrestlers runners movie stars will be there dhule news)

जिल्हा पोलिस दलाचा पुढाकार, महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे सहकार्य, शैक्षणिक क्षेत्रातील अग्रेसर एसव्हीकेएम संस्था, रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड आणि माध्यम प्रयोजक ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या साथीने धुळे शहरातील पोलिस ग्राउंडवर ४ फेब्रुवारीला रविवारी पहाटे पाचपासून मॅरेथॉन होईल. त्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन यातील एकच नोंदणी ग्राह्य धरली जाणार आहे.

बक्षिसांचा वर्षाव

विविध गटांतील महिला व पुरुष विजेत्यांना साडेतीन लाखांहून अधिक रकमेची बक्षिसे दिली जाणार आहेत. त्यांची लयलूट करण्यासाठी आणि या उत्सवात अधिकाधिक संख्येने स्पर्धकांनी मॅरेथॉनसाठी नोंदणी करावी, असे आवाहन आहे.

धुळेकरांनी https://dhulemarathon.iq301.com/ या ऑनलाइन लिंकद्वारे किंवा www.dhulemarathon.in या बेवसाइटच्या माध्यमातून सशुल्क वा मोफत नावनोंदणी करावी. स्पर्धेसाठी शुक्रवारी (ता. २६) मध्यरात्रीपर्यंत स्पर्धकांना ऑनलाइन नोंदणी करता येईल.

अर्जासाठी येथे सुविधा

छापील अर्जासाठी (ऑफलाइन नोंदणी) पोलिस मुख्यालय; जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे; तसेच धुळे सकाळ कार्यालय, बर्वे कॉम्लेक्स, जिजामाता हायस्कूल समोर, धुळे; कांकरिया मेडिकल, दत्त मंदिर चौक, हॉटेल पंकज शेजारी, देवपूर, धुळे; क्विन्झ स्पा ॲन्ड ब्यूटी केअर, पद्‌मश्री टॉवर, वाडीभोकर रोड, देवपूर, धुळे; सुनील मेडिकल.

Sangram Singh, Vijay Chaudhary, Kavita Raut, Sanskriti Balgude
Mumbai Marathon : गुजरातने सोडले, महाराष्ट्राने तारले; निरमाबेनची पूर्ण मॅरेथॉनमध्ये बाजी

अभय हॉस्पिटल शेजारी, ८० फुटी रोड, धुळे; माय होम शोरूम वरचा मजला, महात्मा गांधी मार्केट, शिरपूर; रेवती लेडीज शॉप बँक ऑफ महाराष्ट्र जवळ, दोंडाईचा; धनंजय लक्ष्मण सोनवणे तालुका क्रीडा मार्गदर्शक, तालुका क्रीडासंकुल, तहसील कार्यालयाशेजारी, साक्री; आयएमए हॉल, जेल रोड, क्युमाइन क्लबसमोर, धुळे येथे स्पर्धकांनी संपर्क साधावा.

सेलिब्रेटींचे आकर्षण

धुळे मॅरेथॉनसाठी यंदा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कुस्तीपटू संग्राम सिंग, ट्रिपल महाराष्ट्र केसरी तथा अपर पोलिस अधीक्षक विजय चौधरी, आंतरराष्ट्रीय धावपटू तथा सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊत आणि सिनेतारका संस्कृती बालगुडे आकर्षण असतील. हे मान्यवर धुळे मॅरेथॉनचे ब्रॅन्ड ॲम्बेसेडर असून, केवळ सामाजिक बांधिलकीतून ४ फेब्रुवारीला धुळेकरांच्या भेटीला येत आहेत.

चौघांची अभूतपूर्व कामगिरी

एक अर्धांगवायू झालेला मुलगा जागतिक कुस्ती चॅम्पियन कसा बनला याबद्दल हरियानातील संग्राम सिंग यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आहे. वर्ल्ड रेसलिंग प्रोफेशनल्सद्वारे जगातील सर्वोत्कृष्ट व्यावसायिक कुस्तीपटू म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांनी २०१५ आणि २०१६ मध्ये दोन कॉमनवेल्थ हेवीवेट कुस्ती स्पर्धा जिंकल्या आहेत.

महाराष्ट्राचा स्टार कुस्तीपटू व तीन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता अपर पोलिस अधीक्षक विजय चौधरी यांनी देशासाठी सोनेरी कामगिरी केली आहे. अनेक मानाच्या कुस्त्यांमध्ये बाजी आणि राष्ट्रीय सुवर्णपदकावरदेखील त्यांनी आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे.

Sangram Singh, Vijay Chaudhary, Kavita Raut, Sanskriti Balgude
Mumbai Half Marathon : एकसारखीच वेळ...तरीही बुलडाण्याची पूनम दुसरी;अर्धमॅरेथॉनमध्ये पहिला क्रमांक थोडक्यात हुकला

आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत आदिवासीबहुल भागातील सावरपाडा (ता. त्र्यंबकेश्‍वर, जि. नाशिक) येथील असून, क्रीडा क्षेत्रात तिने लक्षवेधी कामगिरी केली आहे. २०१६ मध्ये झालेल्‍या रिओ ऑलिंपिकमध्ये मॅरेथॉन या गटातून तिने भारताचे प्रतिनिधित्व केले. कामगिरीमुळे ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ म्हणून जगभर तिची ओळख झाली.

मराठी मनोरंजन विश्वातील सिनेतारका संस्कृती बालगुडे हिने सांगतो ऐका, शॉर्टकट, निवडुंग, भय आदी चित्रपट, तर पिंजरा, विवाह बंधन, चला हवा येऊ द्या आदी टीव्ही मालिकांमध्ये तिने काम केले आहे.

यंदा रन फॉर पांझरा...

धुळे मॅरेथॉनचे फिट धुळे-हिट धुळे हे घोषवाक्य, तर यंदा रन फॉर पांझरा अशी थीम आहे. याअनुषंगाने काही उपक्रम राबविले जातील. धुळेकरांसह राज्यातील स्पर्धकांना सहभागाचे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे.

महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, जिल्हा परिषद सीईओ शुभम गुप्ता, जिल्हा क्रीडाधिकारी अविनाश टिळे आणि अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्यासह ‘सकाळ’ माध्यम समूहाने केले.

Sangram Singh, Vijay Chaudhary, Kavita Raut, Sanskriti Balgude
Dhule Marathon 2024 : धुळे मॅरेथॉनच्या नोंदणीस सुरवात; ऑफलाइन सुविधेच्या लाभाचे आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()