Dhule News : अज्ञाताकडून फीडर मुद्दाम नादुरुस्त; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Feeder deliberately damaged by unknown dhule news
Feeder deliberately damaged by unknown dhule newsesakal
Updated on

सोनगीर (जि. धुळे) : बोरकुंड ते नंदाळे (ता. धुळे) दरम्यान ११ केव्ही बोरकुंड कृषी वाहिनीवर काही दिवसांपासून कान्होळी नदी पुलाच्या डाव्या बाजूकडील शेतशिवारात अज्ञात व्यक्ती वीजवाहिनीवर तार टाकून फेज टू फेज फॉल्ट करून फीडर मुद्दाम बंद पाडत आहे. (Feeder deliberately damaged by unknown dhule news)

त्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊन शेतीला पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानुसार शिरूड महावितरण कक्षाचे सहाय्यक अभियंता तुषार महाजन यांनी धुळे तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

दरम्यान, बोरकुंड ग्रामपंचायत कार्यालयात सर्व शेतकऱ्यांना बोलावून समज देण्यात आली असतानाही सोमवारी (ता. १३) त्याच ठिकाणी तार टाकून फीडर बंद पाडले गेले. म्हणून मंगळवारी (ता. १४) तालुका ठाण्यात फिर्याद दाखल झाली.

शिरूड कक्षांतर्गत १६ गावे असून, बोरकुंड, रतनपुरा, नंदाळे या गावांचा समावेश आहे. बोरकुंड व नंदाळे शिवारातील कृषिपंप वीजग्राहकांना ३३/११ केव्ही जुनवणे उपकेंद्र येथून ११ केव्ही बोरकुंड कृषिपंप वाहिनीद्वारे दिवसा व रात्री प्रत्येकी आठ तास चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा केला जातो.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

Feeder deliberately damaged by unknown dhule news
Dhule ITI : धुळे आयटीआयला 'या' तारखेला भरती मेळावा

११ केव्ही बोरकुंड वाहिनीची लांबी २० किलोमीटर असून, हिसवाड धरणापर्यंत गेली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून काही अज्ञात व्यक्ती ११ केव्ही बोरकुंड कृषिपंप वाहिनीवर तार टाकून वीजपुरवठा मुद्दामहून बंद पाडून शेतकऱ्यांसह महावितरण कंपनीचेही नुकसान करीत आहेत.

सोमवारी जुनवणे उपकेंद्रातील सहाय्यक यंत्रचालक नरेंद्र ठाकूर फीडर सुरू करण्यास गेले असता ते सुरूच झाले नाही. रात्री सव्वानऊला बोरकुंडचे तंत्रज्ञ सागर हरड व संदीप सूर्यवंशी यांनी पाहणी केली असता वीजवाहिनीच्या दोन तारांवर तारेचा तुकडा टाकून फेज टू फेज फॉल्ट करून वीजपुरवठा मुद्दाम बंद केलेला आढळला. म्हणून ही फिर्याद दाखल झाली. या प्रकरणी तपास सुरू झाला आहे.

Feeder deliberately damaged by unknown dhule news
Nashik News: संदीप विद्यापीठाचा बेलारुशियन युनिव्हर्सिटीसोबत करार; आंतरराष्ट्रीय शिक्षणाची दारे खुली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.