नवापूर (जि. नंदुरबार) : शेजारच्या भांडणाचे रूपांतर थेट दोन गटांत तलवारीने हाणामारीत होऊन चार जण जखमी झाले. नवापूर शहरातील रेल्वेस्थानकाजवळील अमन पार्क येथे दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारीची घटना शनिवारी रात्री घडली. तलवारी आणि लाठ्याकाठ्यांनी दोन गटांनी एकमेकांवर जोरदार हल्ला केला. यात चार जण जखमी झाले. यातील काही संशयित आरोपींना पकडण्यात आले असून, परस्परांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. (fierce fight with sword blows at Navapur 4 people injured Nandurbar Latest Crime News)
नवापूर शहरातील रेल्वेस्थानक रोडजवळील अमन पार्क येथे शनिवारी रात्री नऊच्या सुमारास जोरदार हाणामारी झाली. यात घरातील टीव्ही, कपाट, खिडक्यांची तोडफोड करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले. शेजाऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. दोन्ही गटांत बाचाबाची झाली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यात संसारोपयोगी साहित्याची तोडफोड करण्यात आली. या संदर्भात नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
इरफान इब्राहिम शेख (वय २७, रा. अमन पार्क, नवापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी उमेश जुबेर अक्कलवाया, तन्तु असलम मक्राणी, सहेनाज लतीफ मक्राणी, जुलेखा फारुख पानवाला, जुबेर अक्कलवाया, असलम लतीफ मक्राणी, गुलाम नबी फारूक पानवाला, सलमान लतीफ मक्राणी, लतीफ मक्राणी, मुसागो फारूक पानवाला (सर्व रा. नवापूर) यांच्याविरोधात नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्ह्यातील फिर्यादींच्या घराशेजारी वर नमूद संशयित आरोपी राहत असून, लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणावरून फिर्यादींच्या पत्नीसोबत नेहमी भांडण होत असल्याच्या कारणावरून घरात घुसून हाणामारी केली. तलवार, लोखंडी सळई, लाकडी काठ्यांचा वापर करण्यात आला.
जाकिर मुनाफ शेख सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश वाघ यांनी जिल्हा उपरुग्णालयात भेट देऊन जखमींचे जबाब नोंदविले. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अशोक मोकळ तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.