धुळे : हद्दवाढ क्षेत्रातील मालमत्ताधारकांच्या मालमत्ता करात तत्काळ दुरुस्त्या करून नागरिकांच्या अडचणी दूर कराव्यात, अशा सूचना खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी मनपा मालमत्ता कर विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या, तर मालमत्ता कर व मालमत्तांच्या मोजमापामध्ये तफावत असलेल्या मालमत्ताधारकांनी ५ एप्रिलपर्यंत लेखी तक्रारी कराव्यात,
२५ एप्रिलपर्यंत अशा तक्रारींचा निपटारा करण्यात येणार आहे, असा निर्णय महापौरांच्या दालनात झालेल्या बैठकीत झाला, अशी माहिती नगरसेवक किरण अहिरराव यांनी दिली. (File complaint in writing regarding taxation Appeal to citizens of demarcation area through meeting dhule news)
दरम्यान, यामुळे आपण बेमुदत उपोषण स्थगित करत असल्याचेही श्री. अहिरराव यांनी म्हटले आहे. हद्दवाढ क्षेत्रातील मालमत्तांना अवास्तव कर आकारणी केल्याची तक्रार करत ही करवाढ रद्द करा, या मागणीसाठी नगरसेवक अहिरराव यांनी २७ मार्चपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता.
उपोषणाच्या अनुषंगाने २६ मार्चला दुपारी बाराला खासदार डॉ. भामरे यांनी मनपाचे अधिकारी, मालमत्ता विभागाच्या हद्दवाढ भागातील लिपिकांची बैठक घेतली. बैठकीत खासदार डॉ. भामरे यांनी मालमत्ता करामध्ये तत्काळ दुरुस्त्या करून नागरिकांच्या अडचणी दूर कराव्यात, अशा सूचना दिल्या.
दरम्यान, याच बैठकीच्या अनुषंगाने दुपारी चारला महापालिकेत महापौर दालनात बैठक झाली. महापौर प्रतिभा चौधरी, भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, उपमहापौर नागसेन बोरसे, स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, हद्दवाढ भागातील नगरसेवक, मनपा मालमत्ता कर विभागाचे अधिकारी, लिपिक उपस्थित होते. बैठकीत नगरसेवक अहिरराव यांनी तूर्त उपोषण करू नये, असे आवाहन करण्यात आले.
हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार
लेखी तक्रारी नोंदवा
दरम्यान, हद्दवाढ क्षेत्रातील ज्या रहिवाशांच्या मालमत्ता कर तसेच मालमत्तांच्या मोजमापामध्ये तफावत आहे, अशा रहिवाशांनी त्याबाबत मालमत्ता कर विभागात लेखी तक्रारी सादर कराव्यात. त्यावर दुरुस्ती करून नियमाप्रमाणे कर आकारणी केली जाईल, असे श्री. अग्रवाल यांनी बैठकीत सांगितले.
हद्दवाढ भागातील रहिवाशांवर अन्याय होणार नाही याची पूर्ण दक्षता घेणार असल्याचेही ते म्हणाले. ५ एप्रिलपर्यंत रहिवाशांनी तक्रारी नोंदवाव्यात. २५ एप्रिल २०२३ पर्यंत प्राप्त तक्रारींचा एकत्रित निपटारा करण्यात येणार आहे. त्यामुळे तूर्तास आम्ही हद्दवाढ क्षेत्रातील नगरसेवक उपोषण स्थगित करत आहोत, असे नगरसेवक अहिरराव यांनी म्हटले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.