Wild Vegetable Competition : बारीपाड्याची यशोगाथा! ‘ईरा’तून जंगलाची राखण; टाळल्यास दंड

fine for those who cut down wet tree reward for those who find it in baripada dhule news
fine for those who cut down wet tree reward for those who find it in baripada dhule newsesakal
Updated on

Wild Vegetable Competition : आदर्श बारीपाड्याची यशोगाथा समाजासमोर येण्यासाठी शिल्पकार चैत्राम पवार व ग्रामस्थांना अनेक कष्ट उपसावे लागले. यात दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रगतिशील मानसिकतेच्या बळावर त्यांना ही किमया साधता आली.

बारीपाड्याची नैसर्गिक संपदा म्हणजेच जंगल संरक्षणासाठी अख्खे गाव सरसावले. जंगल राखण्यासाठी दोन रखवालदार ठेवले. त्यांना प्रत्येक ग्रामस्थ ईरा म्हणजे धान्य स्वरूपात वर्षाचे मानधन देतात.

शिवाय प्रत्येक घरातील एका व्यक्तीस रात्री जंगल संरक्षणासाठी दिवटी (राखण) असते. त्यात आठ ते दहा जण असतात. अशा दिवट्या वर्षभर सुरूच असतात. जो दिवटी करणार नाही त्याला दंड आकारला जातो. (fine for those who cut down wet tree reward for those who find it in baripada dhule news)

आदिवासीबहुल बारीपाड्याची (ता. साक्री) लोकसंख्या नऊशे ते हजारापर्यंत आहे. तेथे कोकणी, मावची व भिल्ल मंडळी गुण्यागोविंदाने नांदतात. त्यांना एकत्र घेत चैत्राम पवार यांनी बारीपाड्याचा कायापालट करण्याचा विडा उचलला.

शेतकरी व निरक्षर कुटुंबात जन्मलेले श्री. पवार यांनी अपार कष्ट, मेहनतीने एम.कॉम.पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांना नोकरीच्या अनेक संधी चालून आल्या; परंतु गावासाठी व तुझ्या समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, असा त्यांना त्यांच्या मित्राने सल्ला दिला.

उजाड माळरान

बारीपाडा म्हणजे उजाड माळरान, परिसरात वृक्ष, विहिरी, मळे नव्हते. फक्त पावसाळी शेतीवर गाव अवलंबून असे. पावसाळा संपला की ग्रामस्थ रोजगारासाठी मिळेल तिथे कामाला जात. तेथून परतल्यानंतर पावसाळी पिकांची तयारी करायची.

खत टाकायचे, नांगरणी, वखरणीतून शेती तयार करायची, असा दिनक्रम असे. सद्यःस्थितीत गावात सर्वच शेतकरी दुबार पीक घेतात. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी आहेत. भाजीपालाही पिकवितात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

fine for those who cut down wet tree reward for those who find it in baripada dhule news
Wild Vegetable : रानभाज्यांपासून सुरगाण्याचा आयुर्वेदिक चहा; सर्दी, खोकला, ॲसिडिटी, हिवताप, डोकेदुखीवर गुणकारी

परिवर्तनाची कहाणी

बारीपाड्याच्या परिवर्तनाला १९९१ पासून सुरवात झाली. वनवासी कल्याण आश्रमातील मित्राचा सल्ला घेत व गावातील दोन-चार मित्रांना सोबत घेत एकमेकांशी सल्लामसलतीतून गावालगत जंगलात होणारी वृक्षतोड थांबविण्यास श्री. पवार यांनी सुरवात केली. त्यामुळे जंगल आकारास येऊ लागले. पिंपळनेर येथील वन विभाग व बारीपाडा ग्रामस्थांनी समन्वयातून जंगल संरक्षणाचा निर्णय घेतला.

त्यातून १९९२ ला वनसंरक्षण समितीची स्थापना झाली. जंगल संरक्षणासाठी नियमावली तयार करण्यात आली. त्यात चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, तसेच ओले (जिवंत) झाड तोडल्यास दंड, झाड तोडताना सापडल्यास सापडविणाऱ्यास बक्षीस, अशी योजना अमलात आली. गावातील भांडण गावातच मिटविण्यास सुरवात झाली. त्यातील फलनिष्पत्तीतून घनदाट जंगल उदयास आले. त्याचे संवर्धन होण्यासाठी अनेक यशस्वी प्रयोग सुरू झाले. ते कायम आहेत.

सरपणासाठी सूट

गावाला लागणाऱ्या सरपणासाठी वर्षातून एक महिना सूट दिली जाते. त्यात सुकलेली झाडे, मोठ्या झाडांच्या फांद्या, सुकलेल्या फांद्या, काटेरी झुडपे दिली जातात. अशा उपक्रमशील बारीपाड्यात २६ व २७ ऑगस्टला अनोखा महोत्सव होत आहे. त्यात रविवारी (ता. २७) वनभाजी पाककला स्पर्धा-२०२३ होणार आहे. ती निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

fine for those who cut down wet tree reward for those who find it in baripada dhule news
Wild Vegetable Competition 2023 : ग्रामस्थांच्या एकीतून वनौषधी भाज्या, जंगलाचे संरक्षण अन्‌ संवर्धन!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.