Dhule Fire Accident : कुरखळी येथे आगीत 16 लाखांची राखरांगोळी

fire
fire esakal
Updated on

Dhule News : कुलूपबंद घरात शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याने लगतच्या चार घरांमधील संसारोपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली. ही घटना गुरुवारी (ता.१) दुपारी कुरखळी (ता.शिरपूर) येथे घडली. या भीषण आगीत सुमारे १६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला. (fire accident due to short circuit in locked house dhule fire accident news)

कुरखळी गावातील बळवंत दत्तात्रय मोरे लग्नसमारंभासाठी शिरपूरला गेल्याने त्यांचे घर बंद होते. सकाळी अकराला त्यांच्या घरात शॉर्टसर्किट होऊन आग लागली. प्रारंभी घरातून धुराचे लोट उठू लागल्याने ग्रामस्थ जमले. मात्र घरे एकमेकांना खेटून असल्याने आगीचे उगमस्थान समजून आले नाही. उन्हाची तीव्रता व वाऱ्यामुळे काही वेळातच आगीने वेग पकडला.

त्यात घरे लाकडी इमल्याची असल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश मोरे यांनी पालिकेशी संपर्क साधून माहिती दिली. अग्निशमन दलाची वाहने दाखल होईपर्यंत शेजारील घरांमधील रहिवाशांनी आपापल्या छतांवरून मिळेल त्या साधनांनी पाण्याचा मारा आगीवर केला. तब्बल तासाभरानंतर आग आटोक्यात आली. मात्र चार घरांमधील बहुतांश साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

fire
Dhule Fire Accident : मेंद्राना येथील दुर्गा साखर खांडसरीला भीषण आग; लाखोंचे नुकसान

या आगीत बळवंत मोरे यांच्या घरातील शेतोपयोगी वस्तू, धान्य भरलेल्या कणग्या आणि लाकडी नऊ गाळ्यांचे घर असे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. छोटू दत्तात्रय मोरे यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू, धान्य, कपडे, टीव्ही, कूलर, कपाट, छताचे पंखे असे सहा लाख रुपयांचे साहित्य खाक झाले.

राजेंद्र वासुदेव मोरे यांच्या घरातील अंथरूण, पांघरुणासकट रेफ्रिजरेटर, कूलर, लाकडी पलंग, धान्य आदी सहा लाख रुपयांचे साहित्य आगीने गिळंकृत केले. भटू सीताराम मोरे यांच्या १८ गाळ्यांच्या घराचे कडीपाट व जीवनावश्यक वस्तू असे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. महसूल विभागातर्फे आगीचा पंचनामा करण्यात आला.

fire
Fire News : सिंहगड कॅम्पसमध्ये कॅन्टीनला मोठी आग!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()