Dhule News : धुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा ऐन उन्हाळ्यात गजबजायला लागल्या आहेत. जिल्ह्यातील शाळांमध्ये पहिलीचे वर्ग सुरू झाले आहेत. जिल्हाभरात नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व पुस्तके देऊन स्वागत करण्यात येत आहे. (first classes have started in schools of district dhule news)
जिल्ह्यात सलग तिसऱ्या वर्षी पहिली पूर्वतयारी वर्गाचा प्रयोग राबविला जात आहे. यास मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे केंद्र मुख्याध्यापक रामराव पाटील व मुख्याध्यापक शरद चौधरी सांगितले.
ग्रामीण भागात जूनमध्ये प्रवेश घेतल्यानंतर मुलांच्या तयारीत बराच वेळ निघून जातो. काही मुले बुजरेपणामुळे शाळेत येण्यास धजावत नाहीत. नवीन वातावरणात रमत नाहीत. अशा स्थितीत ते अभ्यासात मागे पडतात.
त्यासाठी एप्रिलमध्ये पहिली पूर्व तयारी वर्ग सुरू केल्याने योग्य परिणाम मागील वर्षी पाहायला मिळाले. परिणामी या वर्षी पालकांकडूनच प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील सुमारे एक हजार दोनशे शाळांमध्ये दहा हजारांवर विद्यार्थी दाखल झाले आहेत. ते गप्पागोष्टींसह बाराखडीचे धडे गिरवू लागले आहेत.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
वरखेडी शाळेत जल्लोष
वरखेडी (ता. धुळे) येथील जिल्हा परिषद शाळेत पहिलीत दाखल विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत झाले. या वेळी शिक्षण विस्ताराधिकारी घुगे, अधीक्षक सोनार, केंद्रप्रमुख अविनाश पवार, पुष्पावती चौधरी, कल्पना पाटील, सुनंदा संभाजी पेंढारकर, अनिल देसले, योगिता नगराळे, सोनी पवार, सगुणा पाटील, मनीषा महाजन, शैला नाईक आदी उपस्थित होते.
प्रवेश घ्या फक्त मराठी शाळेतच!
शहरासह खेडोपाडी इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे वाढता कल आहे. अशा स्थितीत डिजिटल मराठी शाळांना ‘अच्छे दिन’ येत आहेत. मुख्याध्यापक शिक्षक आणि शालेय व्यवस्थापन समितीचे प्रयत्न फळास येत आहेत. मराठी शाळेतच शिकलो म्हणून पुढे गेलो, सर्व सुविधांयुक्त शाळा, मोफत सुविधा आदी प्रचारांत गुरुजी गुंतले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.