Police Constable Recruitment : लेखी परीक्षेला पाचशेवर उमेदवार; नमुना उत्तरपत्रिका प्रसिद्ध

Dhule District Police constable recruitment female and male candidates giving written test at police drill ground on Sunday.
Dhule District Police constable recruitment female and male candidates giving written test at police drill ground on Sunday.esakal
Updated on

धुळे : जिल्हा पोलिस शिपाईभरती-२०२१ ची लेखी परीक्षा रविवारी (ता. २) सकाळी पोलिस मुख्यालयाच्या पोलिस कवायत मैदानावर झाली. ४२ पदांसाठी झालेल्या परीक्षेसाठी पाचशेवर उमेदवार हजर होते.

परीक्षा पारदर्शक होण्याकामी पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ पोलिस अधिकारी लक्ष ठेवून होते. परीक्षेदरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी वीसहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली. (Five hundred candidates for written test Model Answer Sheet Released Police Constable Recruitment dhule news)

राज्यात पोलिसभरती प्रक्रिया सुरू आहे. यात मैदानी परीक्षेचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर शारीरिक आणि कौशल्य चाचणीमध्ये पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा रविवारी (ता. २) पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर झाली.

पोलिस शिपाई व चालक अशा ४२ पदांसाठीच्या लेखी परीक्षेला ५०५ महिला व पुरुष उमेदवार उपस्थित होते. बाहेरगावाहून आलेल्या परीक्षार्थींच्या जेवणाची व रात्रीच्या निवासाची सोय पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आली.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

Dhule District Police constable recruitment female and male candidates giving written test at police drill ground on Sunday.
NDA Exam : 'एनडीए' परीक्षा केंद्रासाठी नाशिकला हुलकावणी; विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी गाठावे लागतंय अन्‍य शहर

नमुना उत्तरपत्रिका प्रसिद्ध

दरम्यान, लेखी परीक्षेतील उमेदवारांना देण्यात आलेल्या ए, बी, सी, डी प्रश्नपत्रिका संचाची नमुना उत्तरपत्रिका तालिका पोलिस मुख्यालयाच्या नोटीस बोर्डावर तसेच धुळे जिल्हा पोलिस दलाच्या sp.dhule@mahapolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

लेखी परीक्षेतील प्रश्नांसंदर्भात काही आक्षेप अथवा तक्रारी असल्यास त्यासंबंधी सोमवारी (ता. ३) सायंकाळी सहापर्यंत लेखी अर्ज पोलिस अधीक्षक कार्यालयात सादर करावे. उशिरा प्राप्त तक्रारी अगर आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, असे पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय, धुळे) संभाजी पाटील यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी ०२५६२-२८८२११, ०२५६२-२८८२१२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Dhule District Police constable recruitment female and male candidates giving written test at police drill ground on Sunday.
Police Recruitment : लेखी परीक्षेला 847 उमेदवारांची दांडी; 1032 भावी पोलिसांनी दिली परीक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()