Govt Helpline : बालविवाह, अमली पदार्थविरोधी मोहिमेसाठी 'हा' हेल्पलाइन नंबर जाहीर

helpline for old age
helpline for old age esakal
Updated on

Nandurbar News : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक नंदुरबार जिल्हा पोलिस दलाच्या वार्षिक तपासणीनिमित्त नंदुरबार येथे आले होते.

त्यांनी मांडलेल्या अमली पदार्थमुक्त जिल्हा या संकल्पनेची सुरवात नंदुरबार जिल्ह्यातून करण्यात आलेली आहे. (For anti child marriage anti drug campaign Helpline number announced by District Police Force nandurbar news )

त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात गांजा, अफू इत्यादी प्रकारच्या अमली पदार्थांची चोरटी वाहतूक, लागवड, विक्री करणाऱ्यांची माहिती काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

तंबाखूजन्य व अमली पदार्थांचे सेवन केल्याने त्याचे स्वास्थ्यावर दुष्परिणाम होऊन विविध प्रकारचे आजार होतात. अमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे मनुष्याची आर्थिक, सामाजिक हानी होऊन त्याचा परिणाम कुटुंबीयावर होतो. आजच्या तरुण पिढीने व्यसनापासून लांब राहून नंदुरबार जिल्हा अमली पदार्थमुक्त कसा होईल यासाठी प्रयत्न करावेत.

जिल्ह्यात बालविवाह ही अत्यंत गंभीर समस्या असून, बालविवाहामुळे बालकांच्या विशेषत: मुलींच्या आयुष्यावर अनेक दुष्परिणाम होतात. बालविवाह या समस्येचे समूळ उच्चाटन झाले तर बालविवाहामुळे होणाऱ्या इतर आरोग्याच्या समस्या (उदा. कुपोषण) देखील कमी होण्यास मदत होईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

helpline for old age
Nandurbar News : नंदुरबारमध्ये अतिक्रमणांवर कारवाईचा धडाका सुरूच; अतिक्रमणधारकांची वाढली धकधक

बालविवाह रोखण्यासाठी व अमली पदार्थविरोधी मोहिमेसाठी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना नंदुरबार जिल्हा पोलिस दलातर्फे बालविवाह व अमली पदार्थांसंदर्भात काही माहिती असल्यास तत्काळ मोबाईलवरून ९०२२४५५४१४ अथवा टोल फ्री क्रमांक ११२ या क्रमांकावर द्यावी, हे क्रमांक २४ तास नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध असतील, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिली.

या निरामय भावनेने पोलिस अधीक्षक पाटील यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन अक्षता या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सुरवात केली आहे. यामध्ये गावातील प्रत्येक नागरिकाने सहभागी होऊन बालविवाह रोखण्याची जबाबदारी पार पाडावी, तसेच

महिलांसंबंधी घडणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराच्या व अन्य अत्याचाराच्या घटनांविषयी सजगता निर्माण व्हावी यासाठी शेवटच्या समाजघटकापावेतो राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात गावपातळीवर काम करणारे महत्त्वाचे घटक सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलिसपाटील, आशा स्वयंसेविका, अंगणवाडीसेविका यांचादेखील सहभाग या उपक्रमात करून घेण्यात आला आहे. समाजघटकातील प्रत्येकाने जबाबदारी ओळखून गावात बालविवाह प्रतिबंधाबद्दल जनजागृती करून या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक पाटील यांनी केले.

helpline for old age
Nashik News : कोब्राने केला तरुणाच्या ओठांनाच दंश...!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.