Rakshabandhan 2023 : भाऊराया, जुनी पेन्शनच्या रूपाने ओवाळणी दे..! महिला कर्मचारी भगिनींची साद

Women employees sending rakhi to the Chief Minister.
Women employees sending rakhi to the Chief Minister.esakal
Updated on

Rakshabandhan 2023 : कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या जुन्या पेन्शनचा विषय मागील काळात चांगलाच गाजला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारी नोकरदार आक्रमक झालेले आहेत आणि सरकारला शेवटी आपली भूमिका सोडावी लागली व फॅमिली पेन्शन लागू करत जुन्या पेन्शनचा विषय सरकारने निकाली लावला.

मात्र २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शनचा प्रश्न महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या माध्यमातून रेटून धरला आहे. (For old pension to be applicable to all employees worker female send rakhi to chief minister nandurbar news)

बहीण-भावाच्या नात्याचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यातील महिला कर्मचाऱ्यांतर्फे जिल्ह्यातून हजारो राख्या पाठविण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन नंदुरबारने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांना राखी पाठवीत ‘भाऊराया, जुनी पेन्शनच्या रूपाने ओवाळणी दे..!’ अशी साद महिला भगिनींनी घातली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत राख्या पाठविण्यात येणार आहेत. जुनी पेन्शन सर्व कर्मचाऱ्यांना लागू व्हावी यासाठी हा अभिनव असा उपक्रम राबविला जात आहे. सुमारे चार लाख कर्मचारी २००५ नंतर सरकारी सेवेत रुजू झाले आहेत, तरीदेखील १९८२-१९८४ ची जुनी पेन्शन योजना बंद करून २००५ नंतर डीसीपीएस व एनपीएस नावाची अन्यायकारक अशी योजना सुरू करण्यात आली आहे.

जोपर्यंत जुनी पेन्शन योजना सरसकट लागू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने घेतलेला आहे. सेवेत असलेल्या महिला कर्मचारी आणि पुरुष कर्मचाऱ्यांच्या पत्नी अथवा मुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने राख्या पाठविणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Women employees sending rakhi to the Chief Minister.
Rakshabandhan 2023: गदर 2 सुपरहिट झाला अन् सनी देओलने फॅन्ससोबत साजरं केलं रक्षाबंधन, व्हिडीओ व्हायरल

बहीण भावाला ओवाळते तेव्हा भाऊ काहीतरी भेट देत असतो. मुख्यमंत्र्यांच्या रूपातील भावाकडून जुनी पेन्शनची ओवाळणी देण्याची घाट जिल्हाभरातील भगिनींनी केलेला आहे. २००५ नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुने पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी शासनाचे लक्ष वेधण्याचा संघटनेमार्फत हा अभिनव उपक्रम राबविण्यात आलेला आहे.

दिल्लीत १ ऑक्टोबरला आंदोलन

अनेक विविध प्रकारचे मोर्चे, आंदोलने करूनदेखील झोपलेल्या शासनाला जाग येत नाही म्हणून येत्या १ ऑक्टोबरला संपूर्ण देशभरातील कर्मचारी दिल्ली येथे आंदोलन करणार आहेत. आंदोलनाला जिल्हाभरातून शेकडो कर्मचारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप रायते यांनी दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संदीप रायते, राहुल पवार, उमेश पाडवी, तुषार सोनवणे, दयानंद जाधव, प्रवीण परदेशी, शैलेंद्र रघुवंशी, गजानन मराठे, पंकज होडगर, मन्मथ बर्डे, धीरसिंग वसावे, प्रवीण मासुळे, चंद्रकांत वाघ, चूडामण सरगर आदी विशेष प्रयत्न करीत आहेत.

"रक्षाबंधनानिमित्त आमच्या अंधकारमय भविष्याच्या ताटात मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शनची ओवाळणी टाकून लाखो बहिणींच्या शुभेच्छा स्वीकाराव्यात." -सोनाली जिरे

"सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू व्हावी याकरिता या अभिनव उपक्रमात सर्व भगिनींनी सहभाग नोंदवावा." -प्रतिभा जाधव

Women employees sending rakhi to the Chief Minister.
Rakshabandhan 2023: लक्ष्मी मातेने केली होती रक्षाबंधनाची सुरुवात; भगवान विष्णूंना परत आणण्यासाठी...; जाणून घ्या कथा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.