Nandurbar Crime News : नंदुरबार येथील राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने तळोदा शहरापासून जवळच असलेल्या अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर रस्त्यालगत हॉटेल सद्भावनासमोर असलेल्या पत्री शेडमधून दोन व्यक्तींच्या ताब्यातून परराज्यातील मद्य व दोन वाहनांसह २५ लाख ८३ हजार ९२० किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या धडक कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.(Foreign liquor 2 vehicles and valuables worth 25 lakhs seized nandurbar crime news)
याबाबत राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्काच्या नंदुरबार येथील भरारी पथकाला गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने मंगळवारी सायंकाळी तळोदा शहरापासून जवळच असलेल्या अंकलेश्वर-बऱ्हाणपूर रस्त्यालगत आमलाड शिवारातील हॉटेल सद्भावनासमोर असलेल्या पत्री शेडमध्ये छापा टाकला.
त्यात त्या ठिकाणी दोन वाहनांत, तसेच पत्री शेडमध्ये परराज्यातील विदेशी मद्य व बियरच्या २३३ बॉक्ससह २५ लाख ८३ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, (द.अं) राज्य उत्पादन शुल्क सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त डॉ. बी. एच. तडवी, राज्य उत्पादन शुल्काच्या नंदुरबारच्या अधीक्षक स्नेहा सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. धडक कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
भरारी पथकात राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे नंदुरबार येथील दुय्यम निरीक्षक पी. जे. मेहता, राज्य उत्पादन शुल्क नंदुरबारचे निरीक्षक बी. एस. महाडिक, राज्य उत्पादन शुल्क नंदुरबारचे दुय्यम निरीक्षक पी. एस. पाटील, सा. दु. निरी, एम. के. पवार, राहुल डो. साळवे, हितेश पी. जेठे, भूषण चौधरी, मानसिंग पाडवी, हेमंत पाटील, धनराज पाटील, संदीप वाघ यांचा समावेश होता. गुन्ह्याचा तपास राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे नंदुरबार येथील दुय्यम निरीक्षक पी. जे. मेहता करीत आहेत.
तळोदा पोलिसांना सुगावाच नाही
ज्या ठिकाणी नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने मंगळवारी कारवाई केली ते ठिकाण शहरापासून हाकेच्या अंतरावर आहे. मात्र या ठिकाणी काय सुरू आहे याची कल्पना तळोदा पोलिसांना नसल्याने तसेच नंदुरबारचे पथक येऊन कारवाई करते, परंतु तळोदा पोलिसांना काहीच सुगावा लागत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.