आंतरराज्य मांडूळ तस्करी करणारी टोळी नंदुरबार पोलिस, वनविभागाने पकडली   

आंतरराज्य मांडूळ तस्करी करणारी टोळी नंदुरबार पोलिस, वनविभागाने पकडली   
Updated on

नवापूर : मांडुळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या दोन जणांना नवापुर पोलिसांनी पकडले. तसेच पोलिसांनी वन विभागाच्या संशयीत आरोपींना ताब्यात देवून वन विभागाने 
वन्यजीव अपराध प्रकरणी वन गुन्हा नोंद केला आहे. तर नवापूर न्यायालयाने आरोपींना 8 जानेवारी पर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली आहे.

नवापूर शहरातून गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील दोन जण मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करीत असल्याची माहिती नवापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी दोन आरोपी, एक मांडूळ प्रजातीचा साप, एक मारुती सुझुकी अल्टो वाहन जप्त केले. नवापूर पोलीसांनी कारवाई न करता वन विभागाकडे सदर दोन्ही आरोपी मांडूळ असा मुद्देमाल देण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी दिली.

आघोरी विद्येसाठी मांडूळची तस्करी

मांडूळ या सापाचा काळी जादू, अघोरी विद्या, गुप्त धन शोधण्यासाठी, पैशांचा पाऊस पाडण्यासाठी, सट्टाचे आकडे काढण्यासाठी उपयोग होतो. अशी अंधश्रद्धा आहे असून विविध प्रकारच्या अंधश्रद्धेने दुर्मीळ मांडून सापाची तस्करी केली जात असल्याचे बोलले जात आहे. मांडूळाची किंमत लाखांच्या घरात असते.

गुजरात सीमावर्ती भागात तस्करी

नवापूर शहर महाराष्ट्र-गुजरात राज्यातील सीमावर्ती भागात असल्याने मांडूळाची तस्करी होत असल्याची माहिती समोर आली आहे. मांडूळची तस्करी महाराष्ट्र राज्यातील जंगलातून झाली की गुजरात राज्यातील जंगलातून हा संशोधनाचा विषय आहे.

अन्य संशयीताच्या शोधात पथक रवाना

वनविभागाने मांडूळ संदर्भात कसून चौकशी करत महाराष्ट्र गुजरात राज्यातील अनेक भागात टिम रवाना करीत संशयित आरोपींची धरपकड करण्यात आली आहे.असून संशयित आरोपी हाती लागण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. मांडूळ तस्करी बाबत अक्कलकुआ येथून 6 जानेवारीला अरमान अब्दुल, मजीत मकराण यांना अटक करण्यात आली आहे.

कशासाठी मांडूळ सर्पाची मागणी 

नवापूर वन विभागातम गृहात अनेक मंडळीची अधिकाऱ्यांना भेटीगाठी साठी गर्दी दिसून आली. या मांडूळ तस्करी चे धागेदोरे गुजरात राज्यात गेल्याचे बोलले जात आहे. मांडूळ साप घरात आणल्याने रातोरात मनुष्य करोडपती होतो असे अनेक दशकापासून गैरसमज पसरला गेला आहे. मार्केटमध्ये त्याची मोठी किंमत असल्याने त्यामुळे या मांडूळाची तस्करी मोठ्या प्रमाणात होते. यासंदर्भात वन विभागाने सतर्क राहणे गरजेचे आहे. जंगलात गस्त वाढण्याची गरज आहे. 

यांनी केली कारवाई

धुळे वनसंरक्षक डी व्ही पगार, नंदुरबार उपवनसंरक्षक सुरेश केवटे, उमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव धनंजय पवार, नवापूर वनक्षेत्रपाल आर बी पवार यांच्या पथकाने कारवाई केली आहे. मांडूळ तस्करी संदर्भात अजून किती तस्करांची वन विभाग धरपकड करतो हे येणारी वेळच सांगेल.

संपादन- भूषण श्रीखंडे 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.