Dhule News : ‘व्हिजनरी’ सर्वसमावेशक नेतृत्व : जयकुमार रावल

Jaykumar Rawal
Jaykumar Rawalesakal
Updated on

विकासाचा राजमार्ग प्रशस्त करण्याचे कार्य राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या कृतिशील प्रयत्नातून उभारले आहे. एखादा उच्चशिक्षित लोकप्रतिनिधी जनतेशी समन्वय साधत विकासाचे व्यवस्थापन करू शकतो, हे त्यांनी कार्यकर्तृत्वातून दर्शविले आहे.

प्रथम २००४ मध्ये वयाच्या २८ व्या वर्षी लोकप्रियतेमुळे आमदार म्हणून निवडून येण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी मतदारसंघ विकासाचे व्हिजन कसे असावे याबाबत चुणूक दाखविली. ते शहादा-दोंडाईचा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी होते. पुढे २००९ ला मतदारसंघाची पुनर्रचना झाली.

त्यात साक्री तालुक्यातील माळमाथा परिसराच्या १९ गावांसह स्वतंत्र शिंदखेडा मतदारसंघ निर्माण झाला. या मतदारसंघात सिंचनाच्या समस्यांसह रस्ते, वीज, पाणी, मूलभूत सुविधांचा विकास अशा अनेक समस्यांचा डोंगर उभा होता. आजपर्यंतच्या एकाही लोकप्रतिनिधीने या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले नव्हते. (Former Cabinet Minister and MLA Jaykumar Rawal life in politics about article on his birthday dhule News)

Jaykumar Rawal
Nashik News : रामतीर्थावर 18व्या शतकातील शिलालेख; पुण्याचे विरगळ अभ्यासक अनिल दुधाणेंचे संशोधन

शिंदखेडा मतदारसंघातील जनतेने २००९ मध्ये प्रचंड मताधिक्याने आमदार जयकुमार रावल यांना पुन्हा नेतृत्वाची संधी दिली. तिचे सोने करत त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने समस्या सोडविण्याची मानसिक तयारी केली.

त्यासाठी संघर्षही केला. दरम्यानच्या काळात शासनाशी संघर्षातून माळमाथा परिसरात १२५ मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प खेचून आणण्यात आमदार रावल यांनी यश मिळविले. विरोधी पक्षाचे सरकार असताना या टर्ममध्ये मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी सरकारशी मोठा संघर्ष केला. या संघर्षाची आणि मतदारसंघाच्या विकासासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची दखल घेत मतदारसंघातील जनतेने २०१४ मध्ये आमदार रावल यांना पुन्हा मोठ्या मताधिक्याने निवडून दिले.

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

Jaykumar Rawal
New Serial : भोसले - जमदाडे पुन्हा घेणार गुन्ह्याचा शोध, नवी मालिका लवकरच

राज्याच्या राजकारणातही संघटन आणि विकास या कार्यगुणांवर निष्ठा असल्यामुळे आमदार जयकुमार रावल यांच्या कार्याची दखल घेत त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची संधी दिली. रोजगार हमी योजना व पर्यटन खात्याची जबादारी मिळाल्यानंतर मतदारसंघात विकासाची प्रक्रिया गतिमान झाली. वैयक्तिक लाभाच्या योजनेतून मागेल त्याला सिंचन विहीर देत पाच हजारांहून अधिक सिंचन विहिरींची निर्मिती केली. प्राचीन पर्यटन स्थळांचा विकास करत मतदारसंघातील प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून मोठा निधी उपलब्ध करून दिला. तालुक्यासह जिल्ह्यातील पर्यटन विकासाचा अनुशेष दूर केला. याबरोबरच प्रत्येक गावाला लाखोंचा निधी उपलब्ध करून मूलभूत विकास केला.

Jaykumar Rawal
Jalgaon News : सहनशीलतेची टर्रर्र उडवली जातेय... तरीही आपण शांतच!

शिंदखेडा मतदारसंघाच्या राजकीय क्षितिजावर लोकनेते जयकुमार रावल यांचा उदय होणे हे या मतदारसंघाचे भाग्य म्हणावे लागेल. मतदारसंघात आज जी विकासाची मोठी शृंखला ठळकपणाने दृष्टीस पडते, ते जनतेच्या साथीने आणि साक्षीने आमदार जयकुमार रावल यांनी केलेल्या अविश्रांत परिश्रमाचे फळ आहे. शिंदखेडा मतदारसंघ आज दुष्काळमुक्त झाला आहे. शेतीला बारमाही बागायत करण्यासाठी सिंचनाची साधने निर्माण झाली आहेत. मतदारसंघाच्या माध्यमातून वाहणाऱ्या बुराई नदीवर ३४ बंधारे बांधून पाणी अडविण्यात आले आहे.

रोजगार हमी योजनेतून सात हजारांपेक्षा जास्त सिंचन विहिरी निर्माण करून या माध्यमातून हजारो हेक्टर जमीन बारमाही ओलिताखाली आली आहे. सुलवाडे, प्रकाशा, सारंगखेडा या तापी नदीवरील बॅरेजमध्ये पाणी अडवून तालुक्यातील भूजल पातळी वाढली आहे. तसेच दोन हजार ४०० कोटींच्या भरीव निधीतून सुलवाडे-जामफळ उपसा सिंचन योजना साकारली जात आहे.

प्रकाशा-बुराई उपसा जलसिंचन योजनेचे काम सुरू आहे. हायब्रिड ॲन्युइटीच्या माध्यमातून बेटावद-शिंदखेडा-दोंडाईचासारख्या कोट्यवधींच्या निधीतून अनेक रस्ते मतदारसंघात झाले आहेत. गावागावांना जोडणारे प्रशस्त रस्ते ग्रामीण भागात निर्माण झाले आहेत. गावांतर्गत मूलभूत विकासासाठी निधी उपलब्धता करून स्थानिक विकास साधला आहे.

Jaykumar Rawal
Nashik News : दिंडोरी, पेठ रोडवरील ब्लॅक स्पॉट जैसे थे

नरडाणा औद्योगिक वसाहतीत वंडर सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंटसारखे अनेक उद्योग आणण्यात यश आले आहे. या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. दोंडाईचा पालिका इमारत, राजपथ, संविधान पथ, नदीकाठी सौंदर्यीकरण, शिंदखेडा पंचायत समिती इमारत, तहसील कार्यालय यासह अनेक प्रशासकीय इमारती बांधण्यात आल्या आहेत. शिंदखेडा ग्रामपंचायतीचे ग्रामपालिकेत रूपांतर करून शहराचा गतिमान विकास केला आहे. गेल्या काळात ज्या-ज्या वेळेला शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती आली आहे, कधी महापूर, कधी अतिवृष्टी, तर कधी दुष्काळी परिस्थिती... त्या-त्या वेळेला शासनाकडून जलदगतीने मदत आणून देण्याचे काम आमदार जयकुमार रावल यांनी केले आहे. हा जो मतदारसंघात विकासात्मक बदल दिसतोय, त्याचबरोबर दोन्ही जिल्ह्यांत ज्या गतीने पक्ष वाढला आहे, ते सर्व आमदार रावल यांच्या नियोजनपूरक अविश्रांत परिश्रमाचे फळ आहे.

Jaykumar Rawal
Crime News : घरात नेऊन नऊ वर्षांच्या चिमुरडीवर तरुणांचा सामूहिक बलात्कार; मोबाईलमध्ये शूट केला अश्लील व्हिडिओ

"शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात सिंचनापासून ते सर्व क्षेत्रांतील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी अविश्रांत मेहनत घेणारे, दुष्काळमुक्तीसहित सर्वांगीण विकासात मतदारसंघाला अग्रेसर ठेवणारे भाजपचे नेते, माजी पर्यटन, रोहयोमंत्री व विद्यमान आमदार जयकुमार रावल यांचे सक्षम, समर्पित नेतृत्व सध्या खानदेशवासीय अनुभवत आहेत. अशा कार्याचा त्यांच्या सोमवारी (ता. १६) साजरा होणाऱ्या वाढदिवसानिमित्त घेतलेला परामर्श."

विश्वनाथ साबळे, दोंडाईचा

Jaykumar Rawal
Jalgaon News : कडाक्याच्या थंडीत आदिवासी बालकांना मायेची उब; जिल्हाधिकारी आदिवासी पाड्यांवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()