OBC Reservation : माजी आमदार गोटे यांची राज्य सरकारवर टीकेची झोड; मराठा आरक्षणाचे गांभीर्य नाही

anil gote
anil gote esakal
Updated on

OBC Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील या हाडाच्या कार्यकर्त्याने दुसऱ्यांदा उपोषणाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या न्याय्य हक्कासाठी प्राण पणाला लावले आहेत. त्यात सर्व सोबत असून, तीनचाकी राज्य सरकारला या प्रश्‍नाचे गांभीर्य दिसत नाही.

अशा सरकारला वेळ न देता थेट प्रश्‍न सोडविण्यासाठी कृती करायला भाग पाडणे गरजेचे आहे, अशी भूमिका मांडत माजी आमदार अनिल गोटे यांनी ‘कोंबडा आरवतो, पण अंडे देत नाही’ अशा शब्दांत राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली.( Former MLA Gote criticism of state government is not serious about Maratha reservation dhule news )

गुलमोहर विश्रामगृहात सोमवारी (ता. ३०) पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाविषयी भूमिका मांडताना श्री. गोटे म्हणाले, की जरांगे पाटील यांचे आंदोलन भूमिपुत्राचे आहे. मराठा समाजातील गरिबांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केले आहे; परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भूलथापांद्वारे वेळ मारून नेत आहेत.

निरर्थक वाद नको

मराठा समाजास देण्यात आलेले आरक्षण न्यायालयात टिकले नाही. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण नाकारल्यानंतर आमचे सरकार आल्यास तीन महिन्यांत कायमस्वरूपी टिकणारे शाश्‍वत आरक्षण देऊ, असे श्री. फडणवीस म्हणाले होते. त्या वेळी ते सत्तेत नव्हते. मात्र, आता त्यांची सत्ता येऊन १६ महिने झाले. मग या कालावधीत त्यांनी केले काय? दुसरे पक्ष फोडणे आणि विरोधकांमागे ‘ईडी’ची पीडा लावण्यात त्यांनी वेळ घालविला आहे.

सरकारने मागितलेल्या ३० ऐवजी ४० दिवसांची मुदत देऊनही त्यांनी या प्रश्‍नाचा अभ्यास केला नाही. परिणामी जरांगे पाटील यांना प्राण पणाला लावावे लागले आहेत. आश्‍चर्य म्हणजे सत्तारूढ पक्षाचेच नेते ‘मराठा’ आणि ‘कुणबी’ असा निरर्थक वाद उपस्थित करून आपापसांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

anil gote
OBC Reservation : धुळ्यात 22 ला महामेळावा; ओबीसी समाजाच्या बैठकीतील सूर

गोटेंची कडवट टीका

राज्यात मराठ्यांसह धनगर, ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने होत आहेत. आपापसांतील भांडणांमुळे राज्यकर्त्यांचे फावेल. त्यामुळे भांडणे टाळून मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तडीस नेणे आवश्यक आहे. आरक्षणासाठी अहवाल यावा लागेल. विधिमंडळात ठराव करावा लागेल.

केंद्राकडे पाठवावा लागेल, अशी विधाने करणाऱ्यांना जागा दाखवून देण्याची हीच वेळ आहे. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यांनी आरक्षणासंदर्भात कुठलिही भूमिका मांडली नाही. याउलट फक्त शरद पवार यांनी काय केले, असा अवमानजनक प्रश्‍न उपस्थित करून ते निघून गेल्याची टीकाही श्री. गोटे यांनी केली.

anil gote
OBC Reservation : ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही : बाळासाहेब कर्डक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.