Dhule Market Committee : सूसूत्रतेमुळे उत्पन्नात चार पटीने वाढ; चोऱ्यांवर रोख, जनावरांचा बाजार आधुनिक पद्धतीने

Dhule: Bajirao Patil giving information about the affairs. Ex-minister Rohidas Patil next door.
Dhule: Bajirao Patil giving information about the affairs. Ex-minister Rohidas Patil next door.esakal
Updated on

Dhule News : येथील तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारात आणखी सुसूत्रता आणल्याने दैनंदिन उत्पन्नात चार पटीने वाढ झाली आहे.

उत्पन्न वाढीबरोबरच आवारातील स्वच्छता, अतिक्रमण निर्मुलनासह कर्मचाऱ्यांना शेतकरी, व्यापाऱ्यांप्रती सेवाभाव जोपासण्याची सूचना केली आहे. त्यामुळे बाजार समितीच्या कारभारात आमूलाग्र बदल झाला आहे.

भविष्यात आधुनिक पद्धतीने जनावरांचा बाजार भरविला जाईल. शेतकरी आणि व्यापारी, संचालक तसेच प्रत्येक घटकांशी समन्वयातून समितीचा विकास साधला जाईल, अशी ग्वाही सभापती बाजीराव पाटील यांनी दिली.(Fourfold increase in income due to formula Cash on thieves animal market in a modern way Dhule News)

माजी मंत्री रोहिदास पाटील आणि आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात बाजार समितीवर काँग्रेसची सत्ता स्थापन झाली आहे.

सभापतिपदी बाजीराव पाटील, तर उपसभापतिपदाची सूत्रे योगेश पाटील यांनी हाती घेतल्यावर महिनाभरातील कारभाराची माहिती सभापतींनी दिली. ते म्हणाले, की बाजार समितीत शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या मालाच्या होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. असले प्रकार पूर्णपणे कसे बंद होतील यासाठी प्रयत्नशील आहे.

याकामी सीसीटीव्ही यंत्रणा अद्ययावत केली आहे. पोलिस उपअधीक्षक एस. हृषीकेश रेड्डी यांच्या सहकार्याने बाजार समितीत रात्रीची पोलिस गस्त सुरु झाली आहे. सीसीटीव्ही यंत्रणा, सुरक्षा रक्षक आणि पोलिसांच्या गस्तीमुळे भुरट्या चोऱ्यांचा बंदोबस्त झाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dhule: Bajirao Patil giving information about the affairs. Ex-minister Rohidas Patil next door.
Dhule Crime News : कदाणेतील महिला सरपंचाला चौघांकडून मारहाण

स्वच्छतेवरही भर

पावसाळ्यात बाजार समिती आवारातील गटारी तुंबतात. त्यामुळे रस्त्यावर चिखल आणि पाणी साचते. आवारात सांडपाण्याची व्यवस्था झाली आहे. गटारांची साफसफाई केली आहे. शेतकरी, हमाल मापाडी, व्यापारी, आडते तसेच, इतर घटकांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी म्हणून नियमित साफसफाईही केली जात आहे.

जनावरांचा बाजार

बाजार समितीत जनावरांचा सर्वात मोठा बाजार भरतो. यात येथील बाजार समिती राज्यात अव्वल आहे. जनावरांची आवक लक्षात घेता भविष्यात आधुनिक पद्धतीने हा बाजार भरविण्याचा मानस आहे. बाजार समिती आवारातील मोकळ्या कोंडवाडा प्लॉटवर बैल बाजार भरविण्याचे नियोजन संचालक मंडळाने केले आहे. त्यासाठी जागाही तयार केली आहे.

Dhule: Bajirao Patil giving information about the affairs. Ex-minister Rohidas Patil next door.
Dhule News : M Pharmacyच्या विद्यार्थ्याची तापी नदीत आत्महत्या

विविध हिताचे निर्णय

बाजार समितीच्या शेडमध्ये तब्बल तीन- तीन महिने व्यापाऱ्यांचा माल पडून राहायचा. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला पुरेशी जागा मिळत नसे. बैठकीत चोवीस तासाच्या आत माल उचलण्याची सूचना दिली. त्याचा परिणाम बाजार समितीच्या आवारातील शेडमध्ये शेतीमालासाठी मुबलक जागा उपलब्ध झाली आहे.

परिणामी पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या मालाचे पावसापासून रक्षण होईल. समितीतील कर्मचाऱ्यांना गणवेश देण्यात आला. दैनंदिन कार्यालयीन कामकाजाबरोबर प्रत्येक मंगळवारी जनावरांच्या बाजाराचे आणि शुल्क वसुलीचे योग्य नियोजन केले आहे. कारभारात आमूलाग्र बदलाने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे, असे सभापती पाटील यांनी सांगितले.

उत्पन्नात चार पटीने वाढ

बाजार समितीचा विकास व्हावा, त्यातून शेतकऱ्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा देता याव्यात, उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात नियमाप्रमाणे शासनाचे बाजार शुल्क व सुपरव्हिजन शुल्क भरण्याबाबत सूचना केल्या. तसेच मंगळवार हा बाजाराचा दिवस असतो. व्यवहारात सुसूत्रता व पारदर्शकता आणत या उत्पन्नातही चारपटीने वाढ झाली आहे, असे सभापतींनी सांगितले.

Dhule: Bajirao Patil giving information about the affairs. Ex-minister Rohidas Patil next door.
Dhule Crime News : आयजींचा जुगारअड्ड्यावर छापा; 66 लाखांचा मुद्देमाल ताब्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.