Dhule Cyber Fraud : तरुणीला यूपीआयद्वारे सव्वा दोन लाखांचा गंडा

Dhule Cyber Fraud : तरुणीला यूपीआयद्वारे सव्वा दोन लाखांचा गंडा
Updated on

Dhule Cyber Fraud : विविध बँक खात्यातून यूपीआय ट्रँझेक्शनद्वारे सव्वादोन लाख काढून घेत तरुणीची फसवणूक झाली. या प्रकरणी संशयितावर गुन्हा दाखल झाला. (Fraud by withdrawing 2 lakhs through UPI transactions dhule crime news)

वृषाली महारू पाटील (वय २७, रा. १३९ इंद्रप्रस्थ कॉलनी, वलवाडी, देवपूर, धुळे) हिने सायबर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिला १५ सप्टेंबरला दुपारी पाऊणच्या सुमारास पिंपरी-चिंचवड येथील आयडीएफसी बँक शाखेच्या रिलेशन मॅनेजरचा फोन आला.

त्यात तुमच्या खात्यातून यूपीआयद्वारे ५० हजार रुपये विड्रॉल करण्यासाठी तीन वेळा विनंती केली आहे. ही विनंती आम्हाला फ्रॉड वाटत असून, ही विनंती तुम्ही केली आहे, अशी विचारणा केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dhule Cyber Fraud : तरुणीला यूपीआयद्वारे सव्वा दोन लाखांचा गंडा
Jalgaon Cyber Fraud : वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बनावट फेसबुक अकाउंट बनवून फसवणूक

त्यावर वृषाली पाटील यांनी रक्कम काढण्यासाठी कोणतीही विनंती केलेली नसल्याचे सांगितले. नंतर बँक मॅनेजरने खाते ब्लॉक केले.

वृषाली पाटील यांच्या मोबाईलवर वेगवेगळ्या बँक खात्यांतून सुमारे दोन लाख २६ हजार २९८ रुपये कोणीतरी काढून घेतल्याचा संदेश प्राप्त झाला. संबंधित व्यक्तीने बँक खात्याशी संबंधित ओळख वैशिष्ट्यांचा अप्रामाणिकपणे वापर करून बँक खात्यातून यूपीआय ट्रँझेक्शद्वारे ही रक्कम काढून घेत फसवणूक केली.

Dhule Cyber Fraud : तरुणीला यूपीआयद्वारे सव्वा दोन लाखांचा गंडा
Jalgaon Crime News : हतनूरला पतीकडून पत्नीचा खून; संशयित पती पोलिसांच्या ताब्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()