Dhule News : दोंडाईचा शहरातील सर्वच परिसरात नळांना सारख्याच दाबाचा पाणीपुरवठा व्हावा यासाठी नवीन फिल्टर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली असून, आता त्याद्वारे १३ हजार घरांना मोफत अत्याधुनिक नळ कनेक्शन मिळणार असून, त्याची सुरवात माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते झाली. (Free tap connection to 13 thousand houses in Dondaicha Distribution by MLA Rawal Dhule News)
या वेळी दोंडाईचा-वरवाडे पालिकेचे मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी, माजी आरोग्य सभापती कल्पना नगराळे, भाजप शहराध्यक्ष प्रवीण महाजन, माजी उपनगराध्यक्ष नबू पिंजारी, रवी उपाध्ये, नगरसेवक विजय मराठे, रवींद्र उपाध्ये, खलील बागवान, कृष्णा नगराळे, जितेंद्र गिरासे, निखिल जाधव, छोटू मराठे,
जितू गिरासे, नरेंद्र गिरासे, नरेंद्र कोळी, भरतरी ठाकूर, चिरंजीवी चौधरी, ईश्वर धनगर, कांतिलाल मोहिते, रघुनाथ बैसाणे, देवा पाटील, राजू धनगर, संदीप धनगर, इस्माईल पिंजारी, पंकज चौधरी, हरेश आव्हाड,
भिकन बागवान, पालिकेचे बांधकाम इंजि. जगदीश पाटील, शिवनंदन राजपूत, प्रवीण आगळे, धनराज करनकाळ, भय्या रामराजे, रवींद्र अहिरे, सचिन नगराळे, अजय बिरारे, सागर नगराळे, मुकेश नगराळे, अक्षय चव्हाण, मनोहर कापुरे, प्रफुल्ल नगराळे, आकाश इंदवे, रोहित नगराळे आदी उपस्थित होते.
आमदार रावल म्हणाले, की मागील पाच वर्षांपासून दोंडाईचा शहरात सर्वच भागांत विविध विकासकामे होत असून, नगरलिका नवीन इमारत, राजपथ, चौक सुशोभीकरण, अमरावती नदी फ्रंट, पाणीपुरवठा योजना, संविधान पथ, महापुरुषांची स्मारके,
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अशी नानाविध कामे होत असून, कॉलनी परिसरासह गावभागातही अनेक विकासाची कामे करण्याचे भाग्य लाभले आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर पुन्हा अनेक विकासाची कामे मंजूर झाली आहेत. येणाऱ्या काळात जिल्ह्यात सर्वांत वेगाने विकसित होणारे शहर म्हणून दोंडाईचा शहराचे नाव घेतले जाईल.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण
या कार्यक्रमप्रसंगी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे दलित वस्ती विकास निधीतून ८० लाख रुपये खर्चून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते शनिमंदिरपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण व आरसीसी गटार बांधकाम करणे या कामाचे भूमिपूजन, रमाई आवास घरकुल योजनेच्या माध्यमातून ७१ लाभार्थ्यांना लाभाचे वाटप,
दलीत वस्ती विकास निधीतून विविध गल्ल्यांमध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचे लोकार्पण, पंतप्रधान आवास योजनेतून जवळपास ३५ लाभार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये खात्यात जमा होणार असल्याचे पत्रवाटप करण्यात आले. कृष्णा नगराळे यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र अहिरे यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.